रत्नागिरी -रिफायनरी तसेच आयलॉग प्रकल्पाचं समर्थन केल्यामुळे आपल्या जीवाला धोका असल्याची तक्रार राजापूर तालुक्यातील सागवे जिल्हा परिषद गटाच्या शिवसेना सदस्या लक्ष्मी शिवळकर यांनी नाटे पोलीस ठाण्यामध्ये केली आहे. संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.
नाणार रिफायनरीला समर्थन केल्याने आपल्या जिवाला धोका, शिवसेना पदाधिकाऱ्याची पोलिसात तक्रार हेही वाचा -
राजापूर तालुक्यात पुन्हा एकदा रिफायनरी तसेच आयलॉग प्रकल्पांवरून रणकंदन माजले आहे. विरोधकही आक्रमक आहेत. तर या दोन्ही प्रकल्पांच्या समर्थनार्थ सध्या शिवसेनेचे अनेक पदाधिकारी पुढे येत आहेत. त्यामुळे समर्थकांचीही संख्या वाढत आहे.
दरम्यान, या दोन्ही प्रकल्पांंचे जाहीरपणे समर्थन करणाऱ्या शिवसेनेच्या सागवे विभागाच्या जिल्हा परिषद सदस्य मंदा शिवलकर यांना सागवे भागातील काही पुरूष व महिलांनी एका खासगी वृत्त वाहिनीवर प्रतिक्रिया देताना आपणाला शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याबाबत त्यांनी नाटे पोलीस स्थानकात तक्रार दिली आहे.
शिवलकर म्हणाल्या, आपण प्रकल्पाचे समर्थन केल्याचा राग मनात धरुन सागवे कात्रादेवी गावातील शीतल सीताराम गुरव, वर्षा रवींद्र गुरव, राजश्री राजेंद्र पुरळकर, परशुराम कृष्णा पुजारी व अजय लक्ष्मीकांत राणे यांनी आपल्या विरोधात एका खासगी वृत्त वाहिनीवर भडकावू विधान केले आहे. आपणाला शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकीही दिली आहे. प्रकल्पांना विरोध करणाऱ्या एका पुढाऱ्याच्या जीवावर ही काही मंडळी आपल्याला बदनाम करण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्या म्हणाल्या आहेत.
हेही वाचा -