रत्नागिरी -पर्यावरण मंत्री आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार रविवारी (दि. 31) केंद्र शासनाच्या निषेधार्थ राज्यव्यापी आंदोलनाचा एक भाग म्हणून रत्नागिरीत रॅली काढण्यात आली. यामध्ये सहभागी झालेल्या उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सायकल सवारी करत केंद्राच्या इंधन दरवाढीचा निषेध नोंदवला.
केंद्र सरकारचा करण्यात आला निषेध
यावेळी मंत्री सामंत म्हणाले, शंभर कोटी जनतेला कोरोना लस दिल्यामुळे देशभरात कौतुकाचा वर्षाव होत आहे. मात्र, पेट्रोल, डिझेलचे भाव शंभर रुपयांच्या वर गेले आहेत. त्याचे नक्की काय करायचे. ते भाव कमी कसे करता येणार. त्याचे परिणाम सामान्यांना सहन करावे लागत आहेत. हे दाखवून देण्यासाठी रत्नागिरीत केंद्र शासनाच्या निषेधार्थ रत्नागिरीत सायकल रॅलीचे काढण्यात आली आहे, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केले.