महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आज रत्नागिरी दौर्‍यावर - aditya thackeray ratnagiri visit news

गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पडणार्‍या पावसामुळे रत्नागिरीतील विविध तालुक्यांमधील शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले आहे. यामध्ये मंडणगड, दापोली, खेड, गुहागर, संगमेश्‍वर, रत्नागिरी, लांजा व राजापुर या तालुक्यांचा समावेश आहे. आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातील अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची पाहणी केली होती.

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आज रत्नागिरी दौर्‍यावर

By

Published : Nov 3, 2019, 1:57 AM IST

रत्नागिरी -अवकाळी पावसामुळे मोठया प्रमाणात झालेल्या भातशेती आणि अन्य पिकांच्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी शिवसेना नेते तसेच युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आज रविवारी रत्नागिरी जिल्ह्याच्या दौर्‍यावर येणार आहेत. आदित्य ठाकरे यांच्यासोबत रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र वायकर हे सुद्धा असणार आहेत.

हेही वाचा -VIDEO: अक्षयच्या 'बाला' गाण्यावर रितेशचा लाडक्या मुलांसोबत धमाल डान्स

गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पडणार्‍या पावसामुळे रत्नागिरीतील विविध तालुक्यांमधील शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले आहे. यामध्ये मंडणगड, दापोली, खेड, गुहागर, संगमेश्‍वर, रत्नागिरी, लांजा व राजापुर या तालुक्यांचा समावेश आहे. आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातील अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची पाहणी केली होती.

आदित्य यांच्यासोबत या दौर्‍यात खासदार विनायक राऊत, म्हाडाचे अध्यक्ष तसेच रत्नागिरीचे आमदार उदय सामंत, जिल्ह्याच्या अन्य विधानसभा क्षेत्राचे आमदार, जिल्हाधिकारी, जिल्हाप्रमुख तसेच शिवसैनिकही उपस्थित राहणार आहेत. अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या झालेल्या नुकसानाची पाहणी करून पंचनामे करण्याचे आदेश रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिले होते. या पंचनाम्याचा अहवाल २ नोव्हेंबरपर्यंत सादर करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.

आदित्य ठाकरे यांच्या दौर्‍याला रविवारी सकाळी १० वाजल्यापासून रत्नागिरी विश्रामगृह येथून सुरूवात होणार आहे. यावेळी ते जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील शेतकर्‍यांच्या झालेल्या पिकनुकसानाची पाहणी करून तेथील शेतकर्‍यांशी चर्चा करणार आहेत. सोमवारी सकाळी १० वाजल्यापासून रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री रविंद्र वायकर उर्वरित तालुक्यातील शेतीच्या झालेल्या नुकसानाची पाहणी करणार आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details