रत्नागिरी- रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या 222 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाने जिल्ह्यात असणारे वर्चस्व पुन्हा सिध्द केले आहे. तब्बल 101 ग्रामपंचायतीवर ठाकरे गटाने वर्चस्व मिळवले आहे. खेड मतदार संघात शिंदे गटाच्या आमदार योगेश कदम यांनी जोरदार मुसंडी मारली आहे, तर रत्नागिरीतही पालकमंत्री उदय सामंत यांनी ठाकरे गटाला जेरीस आणले. बाळासाहेबांच्या शिवसेनेने वरील दोन्ही मतदार संघात मोठी उडी घेतली आहे. गुहागर व राजापूरमध्ये आमदार भास्कर जाधव व आमदार राजन साळवी यांनी आपले वर्चस्व राखण्यात यश मिळवले आहे.
Gram Panchayat Result: रत्नागिरी जिल्ह्यात ग्रामपंचायतींवर शिवसेना ठाकरे वर्चस्व कायम! 101 ग्रामपंचायतीवर विजय
रत्नागिरी जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाने जिल्ह्यात असणारे वर्चस्व पुन्हा सिध्द केले आहे. तब्बल 101 ग्रामपंचायतीवर ठाकरे गटाने वर्चस्व मिळवले आहे. खेड मतदार संघात शिंदे गटाच्या आमदार योगेश कदम यांनी जोरदार मुसंडी मारली आहे
चिपळूण मतदार संघातही ठाकरे गटाने राष्ट्रवादीला धोबीपछाड दिला आहे. तर जिल्ह्यात भाजपाचा सरपंच निवडून आला आहे. जिल्ह्यात झालेल्या 222 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये जोरदार चुरस पाहायला मिळाली. शिवसेना ठाकरे गटाने 101 ग्रामपंचायतीवर तर शिंदे गटाने 45 ग्रामपंचायतीवर दावा केला आहे. भाजपाने 19 ग्रामपंचायती वर्चस्व मिळवले असून, राष्ट्रवादीच्या खात्यात 8 तर काँग्रेसने 3 वर वर्चस्व मिळवले आहे. गाव पॅनलने 45 ठिकाणी वर्चस्व राखले. 101 ग्रामपंचायतीवर ठाकरे गटाने मिळवले वर्चस्व, तर शिंदे गटाचा 45 ग्रामपंचायतीवर सरपंच विजयी झाले आहेत.
एकुण ग्रामपंचायत- 222
बिनविरोध - 66
शिवसेना - 37
शिंदे गट - 09
भाजप- 05
राष्ट्रवादी- 02
काँग्रेस- 00
इतर-13
एक ग्रामपंचायतीसाठी कोणीही अर्ज केला नाही