महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

संजय कदमांवर न्यायालयाच्या अवमानाचा आरोप; आमदार रामदास कदम यांच्याकडून अवमान याचिका दाखल - Shiv Sena MLA Ramdas Kadam news

माजी आमदार संजय कदम यांनी न्यायालयाचा अवमान केल्याचा आरोप शिवसेना नेते आमदार रामदास कदम यांनी केला आहे. त्यामुळे त्यांनी न्यायालयात अवमान याचिका दाखल केली आहे.

Shiv Sena MLA Ramdas Kadam
रामदास कदम - आमदार, शिवसेना

By

Published : Aug 10, 2021, 7:06 PM IST

रत्नागिरी - माजी आमदार संजय कदम यांनी उच्च न्यायालयामध्ये प्रतिज्ञापत्राद्वारे माझी माफी मागून, या पुढे मी काहीही आरोप करणार नाही, असे प्रतिज्ञापत्र लिहून दिले होते. त्यानंतर पुन्हा बेतालपणे वक्तव्य करुन माझ्यावर खोटे आरोप करुन उच्च न्यायालयाचा अपमान केला आहे. ही बाब मी उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली आहे, अशी माहिती शिवसेना नेते आमदार रामदास कदम यांनी खेड येथे पत्रकार परिषद घेऊन दिली आहे.

रामदास कदम - आमदार, शिवसेना

हेही वाचा -घरी बसून कंटाळलेल्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! 17 ऑगस्टपासून शाळा सुरु, शासन आदेश जारी

काय आहे प्रकरण?

योगीता दंत महाविद्यालयासाठी आत्माराम तुकाराम भुवड यांची नगर परिषद हद्दीतील सर्वे नंबर ४५ / १ ब २ ही ४१ गुंठे जागा हडप केल्याचा दावा महाविद्यालयाच्या उभारणीनंतर ९ वर्षांनी केला होता. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असतानाही १ मे २०१७ रोजी आत्माराम भुवड हे तत्कालीन आमदार संजय कदम यांच्यासमवेत उपोषणास बसले होते. भुवड कुटुंबियांनी तलाठी व कार्यालयातून खोटा दाखला घेऊन आपले नाव कुळ म्हणून लावल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत स्पष्ट झाले. याचमुळे आपण संजय कदम व आत्माराम भुवड यांच्यावर १० कोटी रुपयांचा दावा उच्च न्यायालयात दाखल केला होता . या दुय्यम निबंधक दोघांनीही उच्च न्यायालयात बिनशर्त माफी मागत पुढे कोणतेही वक्तव्य करणार नसल्याचे म्हणणे सादर केले. मात्र, तरीदेखील संजय कदम व नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी संयुक्तरित्या पत्रकार परिषदेत भुवड कुटुंबियांची जागा हडप केल्याचा पुन्हा खोटा आरोप करून जनतेची दिशाभूल करत बदनामी करत उच्च न्यायालयाचा अवमान केला आहे. याप्रकरणी न्यायालयात अवमान याचिका दाखल केली असून, लवकरच उच्च न्यायालयाची नोटीसही येईल. आताही माफी मागितली तरी त्यांचा माफीनामा मंजूर न करता १० कोटी रूपयांचा मानहानीचा दावा पुढे सुरू ठेऊन अवमानप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्याची मागणी रामदास कदम यांनी केली आहे.

शासकीय अधिकाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी प्रथम वर्ग न्यायालयाने संजय कदम यांना एक वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. जिल्हा न्यायालयाने सक्तमजुरीची शिक्षा कायम ठेवली आहे, तर उच्च न्यायालयाने त्यांची १० हजार रुपयांच्या जामिनावर सुटका केली आहे. तीन महिन्यांनी न्यायालयात हजेरी लावणे बंधनकारक केले आहे. उच्च न्यायालयाचा अवमान करणाऱ्या संजय कदम यांचा जामीन तत्काळ रद्द करावा, अशी मागणी न्यायालयाकडे केली असल्याचे रामदास कदम यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा -कलम 370 रद्द केल्यानंतर 'इतक्या' लोकांनी काश्मीरात घेतली जमीन, सरकारने लोकसभेत दिली माहिती

ABOUT THE AUTHOR

...view details