महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'मुख्यमंत्री आपला नाही ही भाजपची दुखरी नस, त्यांनी आम्हाला नैतिकता शिकवू नये' - भास्कर जाधवांची भाजपवर टीका

मुंबईच्या माजी पोलीस आयुक्तांच्या लेटरबाॅम्ब प्रकरणावरून शिवसेना आमदार भास्कर जाधवांनी विरोधकांवर घणाघाती टीका केली आहे. भारतीय जनता पार्टीची दुखरी नस म्हणजे भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री झाला नाही, हीच खदखद त्यांच्या मनात असल्याची टीका भास्कर जाधव यांनी केली आहे.

shiv sena mla bhaskar jadhav criticizes bjp
shiv sena mla bhaskar jadhav criticizes bjp

By

Published : Mar 22, 2021, 9:48 PM IST

रत्नागिरी - मुंबईच्या माजी पोलीस आयुक्तांच्या लेटरबाॅम्ब प्रकरणावरून शिवसेना आमदार भास्कर जाधवांनी विरोधकांवर घणाघाती टीका केली आहे. भारतीय जनता पार्टीची दुखरी नस म्हणजे भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री झाला नाही, हीच खदखद त्यांच्या मनात असल्याची टीका भास्कर जाधव यांनी केली आहे.

ज्या झाडावर तुम्ही वाढलात ते झाडंच तुम्ही खायला निघालात -

यावेळी जाधव म्हणाले की, महाराष्ट्रात भाजप बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाच्या संजीवनीने मोठी झाली. ज्या झाडावर तुम्ही वाढलात ते झाडंच तुम्ही खायला निघालात, त्यामुळे नियती कुणालाच सोडत नसते, असा टोला शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी लगावला.

नैतिकतेचे धडे भाजपने आम्हाला शिकवू नयेत -

जाधव म्हणाले की, छोट्या छोट्या गोष्टीत केंद्र सरकार राज्य सरकाच्या गोष्टीत हस्तक्षेप करत आहे. एटीएसचा तपास पूर्ण होत आला असताना तो तपास एनआयएकडे जाणे यातून हेच सष्ट होत असल्याचं मत भास्कर जाधव यांनी व्यक्त केले. तसेच नैतिकतेचे धडे भाजपने आम्हाला शिकवू नये. गुजरातचे गृहमंत्री अमित शाह होते त्यावेळी पोलीस मुख्यसंचालक डी. जी. वंजारी यांनी अमित शाहंवर आरोप केले होते. त्यावेळी अमित शाह यांनी राजीनामा दिला का ?, मोहन डेलकरांची आत्महत्येत नावे दिली त्याचे काय झालं ? त्यामुळे भाजपला नैतिकतेच्या गोष्टी तोंडातून बोलता येतात पण प्रत्यक्ष नैतिकता भाजपने कधीच पाळली नाही, असा टोला भास्कर जाधव यांनी भाजपला लगावला.
हे ही वाचा - महाराष्ट्रात जन्मलेल्या नवीन कोरोनामुळे रुग्णसंख्या वाढली -डॉ. भोंडवे

ABOUT THE AUTHOR

...view details