रत्नागिरी -शिवसेना प्रवक्ते आमदार भास्कर जाधव यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( MNS president Raj Thackeray ) यांच्यावर खोचक टीका ( Shiv sena MLA Bhaskar Jadhav criticized Raj Thackeray ) करत त्यांना काही सवाल केले आहेत. राज ठाकरे हे परिवर्तनवादी नेते आहेत, पक्ष स्थापनेपासून त्यांनी बदललेला झेंडा, पक्षाची धोरणे, मोदींवरची स्तुतीसुमने आणि त्यानंतर मोदींवर केलेली टीका, लाव रे तो व्हिडीओ आणि आताची स्थिती याचा दाखला देत राज ठाकरे हे परिवर्तनवादी भोंगा असून त्यांच्या भोंग्याकडे कुणीही लक्ष देण्याची गरज नाही अशी टीका भास्कर जाधव यांनी केली आहे.
योगींबाबतच्या त्या विधानावरून राज ठाकरेंना सवाल - तसेच ज्या योगींना राज ठाकरे गंजा, म्हणजेच टकल्या म्हणाले होते ते राज ठाकरे आता अयोध्येत जाऊन त्यांच्या टकल्याला शाई लावणार आहेत का? असा खोचक सवाल भास्कर जाधव ( Raj Thackeray statement About yogi ) यांनी केला आहे, ते आज चिपळूण येथे बोलत होते.
राज ठाकरे यांच्यावर भास्कर जाधवांची सडकून टीका - राज ठाकरे यांच्याकडे सध्या नाईलाजास्तव भाजपचा भोंगा वाजवत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे कोणीही लक्ष देण्याची गरज नसल्याचेही ते म्हणालेत. एवढ्यावरच न थांबता भास्कर जाधव यांनी राज ठाकरेंवर सडकून टीका करत पुढील काळात ते पुन्हा भाजपवर टीका करायला सुरुवात करतील आणि आम्हाला मदत करतील असेही उपरोधाने आमदार जाधव हे म्हणाले.