महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिवसेना नेत्यांची मुख्यमंत्र्यांकडे उपमुख्यमंत्र्यांची तक्रार; निधीवाटपावरून व्यक्त केली नाराजी - Manndangadh assembly

उपमुख्यमंत्र्यांच्या विरोधात मुख्यमंत्र्यांकडे शिवसेनेचे मंत्री, आमदार यांनी तक्रारीचा पाढा वाचला आहे. शिवसेना मंत्री आणि आमदार यांनी मुख्यमंत्र्यांकडे अर्थमंत्री अजित पवार यांच्या विरोधात नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री असूनही शिवसेना मंत्री आणि आमदारांना निधी मिळत नाही किंवा कमी निधी मिळतो अशा तक्रारी आहेत.

आमदार योगेश कदम
आमदार योगेश कदम

By

Published : Feb 13, 2022, 7:11 AM IST

रत्नागिरी -उपमुख्यमंत्री अजित पवार हे शिवसेनेच्या मतदारसंघात स्थानिक आमदारांना विश्वासात न घेता परस्पर काही विकासकामे देतात. काही निधी दिला जातोय, त्यामुळे नाराजी वाढत आहे. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्वतः यामध्ये लक्ष घातलेलं आहे. लवकरच यातून मार्ग काढला जाईल असे विश्वास दापोली-मंडणगडचे आमदार योगेश कदम यांनी व्यक्त केला आहे. ते मंडणगडमध्ये बोलत होते.

शिवसेना नेत्यांची मुख्यमंत्र्यांकडे उपमुख्यमंत्र्यांची तक्रार

उपमुख्यमंत्र्यांच्या विरोधात मुख्यमंत्र्यांकडे शिवसेनेचे मंत्री, आमदार यांनी तक्रारीचा पाढा वाचला आहे. शिवसेना मंत्री आणि आमदार यांनी मुख्यमंत्र्यांकडे अर्थमंत्री अजित पवार यांच्या विरोधात नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री असूनही शिवसेना मंत्री आणि आमदारांना निधी मिळत नाही किंवा कमी निधी मिळतो अशा तक्रारी आहेत. याबाबत शिवसेना आमदार योगेश कदम यांना विचारले असता, त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
दरम्यान माझ्या मतदारसंघात शिवसेनेला संपविण्याची ताकद महाराष्ट्रात अजून कोणामध्ये तयार झालेली नाही, असेही ते यावेळी म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details