महाराष्ट्र

maharashtra

रत्नागिरीतही शिवसेनेकडून निलेश राणेंविरोधात निषेध आंदोलन

रत्नागिरीत शिवसेनेकडून निलेश राणेंविरोधा निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी सेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी निलेश राणेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोड्यांनी मारत निषेध व्यक्त केला.

By

Published : Feb 13, 2021, 7:11 PM IST

Published : Feb 13, 2021, 7:11 PM IST

Updated : Feb 14, 2021, 8:37 AM IST

shiv-sena-also-staged-protest-against-nilesh-rane-in-ratnagiri
रत्नागिरीतही शिवसेनेकडून निलेश राणेंविरोधात निषेध आंदोलन

रत्नागिरी - सिंधुदुर्गानंतर आता रत्नागिरीमध्ये देखील माजी खासदार आणि भाजप प्रदेश सचिव निलेश राणेंविरोधात शिवसेना आक्रमक झाली आहे. शिवसेनेच्या वतीने रत्नागिरी शहरात निलेश राणेंविरोधात 'जोडे मारो' आंदोलन करण्यात आले. यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. खासदार विनायक राऊतांविरोधात शब्द काढल्यास सहन केला जाणार असा असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमले होते. शिवाय, महिला आघाडी देखील आक्रमक झाली असून सेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी यावेळी निलेश राणेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोड्यांनी मारत निषेध व्यक्त केला.

रत्नागिरीतही शिवसेनेकडून निलेश राणेंविरोधात निषेध आंदोलन

वाद शिगेला -

सध्या कोकणात शिवसेना विरूद्ध राणे असा वाद दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत विरुध्द माजी खासदार निलेश राणे अशा दोन्ही बाजूने एकमेकांवर आरोप-पत्यारोपांच्या फैरी झडू लागल्याने येथील राजकीय वातावरण तापले आहे. त्यात आपल्या नेत्यांवर होत असलेल्या टिकेला प्रत्युत्तर देण्यासाठी कार्यकर्त्यांनीही उडी घेतली आहे. शनिवारी संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी माजी खासदार निलेश राणे यांच्या निषेधासाठी रस्त्यावर उतरून त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला ‘चप्पल मारो' आंदोलन केले.

खासदार विनायक राऊत यांच्याकडून राणे पिता-पुत्रांवर झालेल्या टिकेला प्रत्युत्तर म्हणून भाजपाचे प्रदेश सचिव तथा माजी खासदार निलेश राणे यांनीही राऊत यांनी केलेल्या टिकेचा समाचार घेतला. आमच्यावर टीका करताना भाषा बदलली नाही तर जिथे दिसाल, तिथे फटके मारेन अशा शब्दात ठणकावले होते. निलेश राणेंच्या या टिकेला प्रत्युत्तर देण्यासाठी रत्नागिरीत शिवसेनेतर्फे झालेल्या पत्रकार परिषदेत जर हिंमत असेल तर त्यांनी रस्त्यावर येऊन आमच्याशी दोन हात करावेत. आम्ही तयार आहोत, असा सज्जड इशारा शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख सुधीर मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिला होता. दरम्यान भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्येही प्रदेश सचिव निलेश राणें यांच्यावर झालेल्या टिकेवरून संतापाची लाट उसळली आहे. भाजपाने देखील शिवसैनिकांना ठणकावत आम्हीही जशास तसे उत्तर देण्याचा इशारा दिला आहे. या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींनी आता शिवसेना विरुध्द भाजपा असा राजकीय संघर्ष आता शिगेला पोहचला आहे. दरम्यान शनिवारी भाजपा प्रदेश सचिव निलेश राणेंविरोधात रत्नागिरीत शिवसैनिक रस्त्यावर उतरले. अगदी संगमेश्वर, लांजा, राजापूर, रत्नागिरी येथून मोठ्या संख्येने शिवसैनिक निषेध आंदोलनासाठी दाखल झालेले होते.

शिवसेनेकडून निषेध आंदोलन -

मारूतीमंदिर येथे हे निषेध आंदोलन करण्यात आले. यापुढे राणे यांच्याकडून टिका झाल्यास त्यांची ही वायफळ बडबड न थांबल्यास येथील शिवसैनिक गप्प बसणार नसल्याचा इशारा उपस्थित सेनेच्या पदाधिकाऱयांनी दिला आहे. यावेळी निलेश राणेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याला महिला शिवसैनिकांनी ‘चप्पलांचे फटके मारून निषेध व्यक्त केला. हे आंदोलन जिल्हापमुख विलास चाळके, जिल्हा संपर्क नेते राजेंद्र महाडिक, जि.प.अध्यक्ष रोहन बने, ज्येष्ठ पदाधिकारी प्रमोद शेरे, तालुकापमुख बंड्या साळवी, दळवी, जगदीश राजापकर, सरवणकर, जया माने, सौ. वेदा फडके, मनिषा बामणे आदीं पमुख पदाधिकाऱयांनी केले होते. त्यानंतर जिल्हा पोलीस अधिक्षकांनाही शिवसेनेच्यावतीने निवेदन देण्यात आले.

Last Updated : Feb 14, 2021, 8:37 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details