रत्नागिरी -डम्पिंग ग्राऊंडला स्थानिकांचा विरोध असतानाही शिवसेना सत्तेच्या जोरावर प्रकल्प रेटत असल्याने लांजा नगरपंचायत क्षेत्रातील कोत्रेवाडी वार्डमधील शिवसैनिकांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. या डम्पिंग ग्राउंड प्रकल्पाला विरोध करत येथील ग्रामस्थांनी भाजपा नेते आणि प्रदेश सचिव निलेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. लांजा येथील आग्रे हॉल या ठिकाणी हा कार्यक्रम पार पडला.
डम्पिंग ग्राऊंडला विरोध करत कोत्रेवाडीतील शिवसैनिकांचा भाजपात प्रवेश - ratnagiri BJP
शिवसेना कोत्रेवाडी याठिकाणी डम्पिंग ग्राउंड प्रकल्प राबवत आहे. मात्र हा प्रकल्प तुम्हाला नको आहे, त्यामुळे मी तुमच्यासोबत आहे. जोपर्यंत हा प्रकल्प १०० टक्के हद्दपार होत नाही, तोपर्यंत मी तुमच्यासोबत आहे, अशी ग्वाही राणे यांनी कोत्रेवाडी ग्रामस्थांना दिली.
'हा प्रकल्प १०० टक्के हद्दपार करणार'
सत्तेच्या जोरावर शिवसेना कोत्रेवाडी याठिकाणी डम्पिंग ग्राउंड प्रकल्प राबवत आहे. मात्र हा प्रकल्प तुम्हाला नको आहे, त्यामुळे मी तुमच्यासोबत आहे. जोपर्यंत हा प्रकल्प १०० टक्के हद्दपार होत नाही, तोपर्यंत मी तुमच्यासोबत आहे, अशी ग्वाही राणे यांनी कोत्रेवाडी ग्रामस्थांना दिली. दरम्यान, संपूर्ण प्रक्रियेत केवळ लोकप्रतिनिधीच नाहीत तर आणखी काही जण गुंतले आहेत. या सर्वांचा भांडाफोड करणार असा इशाराही त्यांनी विरोधकांना दिला. यावेळी व्यासपीठावर रत्नागिरीचे माजी आमदार बाळ माने तसेच भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र नागरेकर, लांजा तालुका अध्यक्ष मुन्ना खामकर, भाजपा लांजा शहर अध्यक्ष प्रमोद कुरूप, जिल्हा चिटणीस हेमंत शेट्ये, तसेच माजी तालुकाध्यक्ष विजय कुरूप तसेच भाई जाधव नगरपंचायतमधील भाजपाचे गटनेते संजय यादव, नगरसेविका शीतल सावंत, मंगेश लांजेकर हे मान्यवर उपस्थित होते.