रत्नागिरी - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दादर भागात असलेले निवासस्थान 'राजगृह'ची अज्ञातांनी तोडफोड केली. राजगृहाची झालेली तोडफोड ही निंदनीय कृती असून आपण याचा निषेध करत असल्याची प्रतिक्रिया गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. रत्नागिरी येथे कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्याकरता आले असता ते बोलत होते.
हे कृत्य करणाऱ्याला कोणत्याही परिस्थितीत पोलीस शोधून काढतील आणि त्यांच्यावर कठोर कारवाई निश्चितपणे केली जाईल, अशी ग्वाही देसाई यांनी यावेळी दिली. यासंदर्भात सीसीटीव्ही फुटेज असेल किंवा जे काही सोर्सेस असतील त्यांच्याकडून माहिती मिळवून असे कृत्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा, अशा सूचना आपण दिलेल्या असल्याची माहिती देसाई यांनी यावेळी दिली.
अहमनगरमधील त्या नगरसेवकांचे मी स्वागत करतो - देसाई
अहमदनगरमधील पारनेर येथील पाच नगरसेवक स्वगृही अर्थात शिवसेनेमध्ये परतले आहेत. त्याबद्दल त्यांचे स्वागत करतो, अशी प्रतिक्रिया देखील शंभुराज देसाई यांनी दिली. दरम्यान, दैनिक सामनाबाबत राजकीय वक्तव्य करणे योग्य नाही, अशा शब्दात देसाई यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.
गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई बोलताना... देवेंद्र फडणवीस हे राज्याचे विरोधी पक्षनेते आहेत, ते त्यांची भूमिका, वक्तव्ये मांडू शकतात तो त्यांचा अधिकार आहे, मात्र सामना हे निर्भिडपणे वस्तुस्थिती मांडत आहे. देशात, राज्यात जे काय सुरू आहे, त्याची वस्तुस्थिती सामना मांडत आहे. त्यामुळे अशा पध्दतीने दैनिक सामनावर राजकीय भाष्य करणे, योग्य नसल्याचे शंभुराज देसाई यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा -दापोली समुद्र किनाऱ्यावर डॉल्फीनला जीवनदान देण्यात तरुणांना यश
हेही वाचा -गणपतीपुळे: जाळ्यात अडकलेल्या कासवाला जीवनदान...