महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दिल्लीतील मरकजमध्ये रत्नागिरीतील एकूण 7 जण सहभागी; आणखी 4 जण क्वारंटाईन - Dr.Bolhe

दिल्लीतील निजामुद्दीन मरकज येथे झालेल्या धार्मिक कार्यक्रमात रत्नागिरीतील आणखी 4 जण सहभागी झाल्याचे उघड झाले आहे. यामुळे रत्नागिरीतील मरकझमध्ये सहभागी होणारांची संख्या 7 झाली आहे.

seven people of ratnagiri participate in markaz
दिल्लीतील मरकझमध्ये रत्नागिरीतील एकुण 7 जण सहभागी; 4 जणांना केले क्वारंटाईन

By

Published : Apr 3, 2020, 9:06 AM IST

रत्नागिरी- दिल्ली येथील निजामुद्दीन मरकजमध्ये रत्नागिरीतील आणखी 4 नागरिक सहभागी झाल्याची माहिती समोर आली आहे. त्या 4 जणांना जिल्हा रुग्णालयात क्वारंटाईन करण्यात आले आहे, अशी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली.

मरकजला गेलेल्यापैकी 5 जणांना जिल्हा रुग्णालयात क्वारंटाईन करण्यात आले असून त्यापैकी एकाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. चौघांचा रिपोर्ट अद्याप मिळालेला नाही, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सतक डॉ.बोल्हे यांनी दिली.

दिल्लीतील त्या कार्यक्रमाला जिल्ह्यातील तिघेजण गेल्याचे यापूर्वी समोर आले होते. तिघांपैकी एक जण मुंबई, तर एक जण आग्रा येथे क्वारंटाईन आहे. तर एकावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते.

ABOUT THE AUTHOR

...view details