रत्नागिरी -कोकणच्या किनारपट्टीवर सध्या निसर्ग चक्रीवादळ घोंघावत आहे. त्याचे परिणाम आता दिसत आहेत. रत्नागिरीत समुद्र खवळला असून अनेक भागात पावसाचा जोर, तर काही ठिकाणी पावसाची रिपरिप पाहायला मिळत आहे. आज दिवसभराच्या तुलनेत वाऱ्याचा वेग देखील वाढला आहे. समुद्रच्या हळूहळू पाणी पातळी वाढत असून, पोलीस किनारी भागात तैनात आहेत. सकाळपासून शांत असलेल्या समुद्राने आता रौद्ररुप धारण केल असून लाटांचा तडाखा किनाऱ्यावर बसत आहे. मध्यरात्री वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे किनाऱ्यावरील नागरीकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच काळजी घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
निसर्ग चक्रीवादळ : दुपारनंतर लाटांचं रौद्ररूप, समुद्राच्या पाणी पातळीत वाढ
आज दिवसभराच्या तुलनेत वाऱ्याचा वेग देखील वाढला आहे. समुद्राची हळूहळू पाणी पातळी वाढत असून, किनारी भागात पोलीस तैनात आहेत. सकाळपासून शांत असलेल्या समुद्राने आता रौद्ररुप धारण केल असून लाटांचा तडाखा किनाऱ्यावर बसत आहे. मध्यरात्री वाऱ्याचा वेग वाढेल. त्यामुळे किनाऱ्यावरील नागरीकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच काळजी घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
निसर्ग चक्रीवादळ आणि अतिवृष्टीच्या दरम्यान अशी घ्या काळजी...
1) मच्छीमार व अन्य व्यक्तींनी समुद्रामध्ये जाऊ नये.
2) 3 जून 2020 रोजी कोणीही आपले घर सुरक्षित असल्यास व अतिवृष्टीमुळे घरामध्ये पाणी घुसणार नाही, याची खात्री असल्यास घरातच सुरक्षित रहावे. घराच्या बाहेर पडू नये.
3)आपले घर मोडकळीस आलेल्या स्थितीमध्ये असेल किंवा कच्च्या स्वरुपाचे असेल तर तत्काळ उंचावरील ठिकाणी किंवा सुरक्षित स्थळी आवश्यक साधनसामग्री सोबत घेऊन स्थलांतरीत व्हावे.
4) घराच्या अवती-भवती वादळामुळे कोणत्या वस्तू, विजेचे खांब किंवा तारा, झाडे पडण्याची शक्यता असल्यास अशा वस्तूंपासून लांब राहावे.
5) आपले पशुधन व अन्य पाळीव प्राणी यांना अगोदरच सुरक्षितस्थळी हलवावे.
6) आपल्याजवळ केरोसीनवर चालणारे बंदिस्त दिवे (कंदिल) बॅटरी, गॅसबत्ती, स्टोव्ह, काडीपेटी या वस्तू उजेड व खाद्यपदार्थ बनवण्यासाठी उपलब्ध ठेवाव्यात.
7) हवामान खात्याकडून मिळणारे इशारे समजण्यासाठी जवळ रेडिओ बाळगावा. त्यासाठी काही जास्त बॅटऱ्या जवळ ठेवाव्यात.
8) सोबत आवश्यक अन्नधान्य, पिण्याचे पाणी, औषधे जवळ ठेवावे.
9) आपला जीव आपल्या मिळकतीपेक्षा महत्वाचा असल्यामुळे प्रथम जीवितास प्राधान्य द्यावे.
10) पिण्याचे पाणी शुद्धीकरण करून वापरावे. उदा. पाणी उकळून प्यावे. पाण्यात मेडिक्लोर मिसळावे.
11) मच्छीमारांनी आपल्या बोटींचे नुकसान होऊ नये म्हणून त्यांना सुरक्षितपणे बांधून ठेवण्याबाबत योग्य त्या उपाययोजना कराव्यात.
12) अतिवृष्टी व चक्रीवादळ याचा एकत्रित फटका टाळण्यासाठी समुद्र किनारी व नदीकिनारी राहणाऱ्या लोकांनी सावधगिरी बाळगावी.
13) ग्रामकृती दलाच्या सूचनेनुसार व जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार सुरक्षित उपाययोजना कराव्यात.
14) सद्यस्थितीत जिल्ह्यात होम क्वारंटाइन असलेले नागरिक व चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर लोकांना सुरक्षित स्थळी पाठवताना एकमेकापासून सुरक्षित अंतरावर असतील, याची दक्षता घ्यावी.
15) मदत आवश्यक असल्यास आपली ग्रामपंचायत/तहसिलदार कार्यालय/ जिल्हा नियंत्रण कक्ष दुरध्वनी क्रमांक 02352- 226248, 222233 वर संपर्क साधावा.