महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मानवी अतिक्रमण; ऐतिहासिक कातळशिल्प नष्ट होण्याच्या मार्गावर - सेंट झेविअर्स महाविद्यालय

मानवी अतिक्रमणामुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. रत्नागिरीमधील निवळी-जयगड मार्गावर असणाऱ्या कातळशिल्पावर अज्ञातांनी सिमेंट काँक्रीट मिक्स करून बाजूच्या बांधकामाला वापरण्यात आले.

कातळशिल्प

By

Published : May 14, 2019, 1:20 PM IST

रत्नागिरी- कातळशिल्प हा जागतिक दर्जाचा ठेवा आहे. त्यामुळे त्याचे संरक्षण केलेच पाहिजे. मात्र हेच कातळशिल्प आता मानवी अतिक्रमणामुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. रत्नागिरीमधील निवळी-जयगड मार्गावर असणाऱ्या कातळशिल्पावर अज्ञातांनी सिमेंट काँक्रीट मिक्स करून बाजूच्या बांधकामाला वापरण्यात आल्याचे उघड झाल्याने खळबळ उडाली आहे.

माहिती देताना


कातळशिल्पाच्या अभ्यासिका आणि मुंबईतील सेंट झेविअर्स महाविद्यालयाच्या प्राचीन भारतीय इतिहास पुरातत्व संस्कृती विभागाच्या प्रमुख डॉ. अनिता राणे कोठारे यांनी हा सगळा प्रकार उघड केला. जयगड मार्गावरील निवळी येथील ही नवाष्म युगातील कातळशिल्प असून इसवीसन पूर्व 9 हजार वर्षांपूर्वीचे हे कातळशिल्प आहे. 12 वर्षांपूर्वी आपणच या कातळशिल्पाचा शोध लावल्याचा दावा अनिता कोठारे यांनी केला.


निवळीतील हे कातळशिल्प म्हणजे एक नकाशा असून अपरांत (कोकण) ते दख्खन प्रांतचा व्यापारी मार्ग यातून दर्शवण्यात आला आहे. हे असे कातळशिल्प जगातील एकमेव असल्याचा दावा देखील अनिता कोठारे यांनी केला आहे. सध्या कोठारे या कोकण दौऱ्यावर असून, या कातळशिल्पाची, अशी दुरावस्था झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. मात्र सरकारी अनास्थेमुळे या कातळशिल्पाची सध्या दुरावस्था झाली आहे. पुरातत्व विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे अनिता राणे-कोठारे यांनी म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details