सलग दुसऱ्या दिवशी दक्षिण रत्नागिरीत पेट्रोल-डिझेलचा तुटवडा - south ratnagiri district
महापुरामुळे दक्षिण रत्नागिरीमध्ये जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा जाणवत आहे. काल(बुधवार) दुपारपासून दक्षिण रत्नागिरीतल्या सर्व पेट्रोल आणि डिझेल पंपावर इंधनाचा तुटवडा आहे. परिणामी सर्वच पेट्रोल पंप बुधवारी दुपारपासून बंद आहेत.
बुधवारी दुपारपासून दक्षिण रत्नागिरीतल्या सर्व पेट्रोल आणि डिझेल पंपावर इंधनाचा तुटवडा आहे
रत्नागिरी - पश्चिम महाराष्ट्रात आलेला पूर आणि खचलेल्या रस्त्यामुळे आंबा घाटातील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. सध्या दक्षिण रत्नागिरीमध्ये जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा जाणवत आहे. महापुरामुळे गेल्या तीन दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या गाड्या दक्षिण रत्नागिरीमध्ये आलेल्या नाहीत. त्यामुळे पावसाच्या संकटाबरोबरच रत्नागिरीकरांना आता इंधन टंचाईला सामोरे जावे लागत आहे.