महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सावरकरांवरील वादग्रस्त लिखाणाचा रत्नागिरीतील सावरकरप्रेमींकडून निषेध - आक्षेपार्ह लिखाण

मध्यप्रदेशमध्ये काँग्रेस सेवादलाकडून वितरित करण्यात आलेल्या पुस्तकात स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत आक्षेपार्ह लिखाण केल्याच्या निषेधार्थ आज रत्नागिरीत आंदोलन करण्यात आले.

निषेध करताना सावरकरप्रेमी
निषेध करताना सावरकरप्रेमी

By

Published : Jan 9, 2020, 2:18 PM IST

Updated : Jan 9, 2020, 3:27 PM IST

रत्नागिरी- मध्यप्रदेशमध्ये काँग्रेस सेवादलाकडून वितरित करण्यात आलेल्या पुस्तकात स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत आक्षेपार्ह लिखाण करण्यात आले आहे. सावरकरप्रेमी तसेच विविध राजकीय पक्षांकडून या लिखाणाचा आणि काँग्रेसचा निषेध करण्यात येत आहे. या आक्षेपार्ह लिखाणाचे पडसाद सावरकरांच्या कर्मभूमीत म्हणजेच रत्नागिरीतही उमटले. रत्नागिरी शहरातील गाडीतळ येथील सावरकर चौकात सावरकरप्रेमींनी एकत्र येत या लिखाणाचा आणि काँग्रेसचा जोरदार निषेध केला. यावेळी राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. चारुदत्त आफळे बुवा यांनीही निषेध आंदोलनात उपस्थिती लावली.

रत्नागिरीतील सावरकरप्रेमींकडून निषेध

मध्यप्रदेशमध्ये काँग्रेसच्या सेवा दलाने प्रस्तुत केलेल्या पुस्तिकेत स्वातंत्र्यवीर सावरकर आणि गोडसे यांच्यात समलैंगिक संबंध होते, असा आक्षेपार्ह मजकूर छापण्यात आला होता. त्यामुळे मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. दरम्यान, आज (दि. 9 जाने.) रत्नागिरीतील सावरकरांच्या पुतळ्यासमोर या लिखाणाचा निषेध नोंदवण्यात आला. राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प चारुदत्त आफळेबुवांसह रत्नागिरीतील सावरकरप्रेमी देखील या निषेधासाठी मोठ्या संख्येनी उपस्थित होते. सावकरांबद्दल लिहिलेल्या या लिखाणाचा निषेध करत काँग्रेस विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. त्याच प्रमाणे आक्षेपार्ह केलेल्या लिखाणाचा निषेध नोंदवण्यासाठी निदर्शने सुद्धा करण्यात आली.

हेही वाचा - 'रेझिंग डे' सप्ताहनिमित्त समुद्रकिनारी रत्नागिरी पोलिसांची स्वच्छता मोहीम

Last Updated : Jan 9, 2020, 3:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details