रत्नागिरी - शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आयएनएस विक्रांत ( INS Vikrant ) वरुन भाजपा नेते किरीट सोमैयांवर आरोप केले ( Sanjay Raut Allegation Kirit Somaiya ) आहे. त्यावरुन राजकारण पेटले आहेत. त्यातच आता भाजपा नेते प्रसाद लाड यांनी संजय राऊतांचा समाचार घेतला आहे. संजय राऊत यांची मनोवृत्ती बिघडलेली आहे. त्यांना गेट वेल सून असे सांगावं लागेल, अशी टीका लाड यांनी राऊतांवर केली ( Prasad Lad Criticizes Sanjay Raut ) आहे. ते आज रत्नागिरीत बोलत होते.
प्रसाद लाड म्हणाले की, राऊत आरोप करताहेत त्यामध्ये कुठलेही तथ्य नाही. स्वतः किरीट सोमैयांनी सांगितलं आहे, जर कुठले आरोप असतील तर खुद्द मुख्यमंत्र्यांना कागदपत्रे द्या आणि माझ्यावर कारवाई करा. पण, सोमैयांना फसवण्यासाठी काहीतरी षढयंत्र करण्याचे काम हे राऊत आणि गॅंग करत आहे. त्यामुळे त्यांना आम्ही घाबरत नाही आणि भिकही घालत नाही. राऊत यांना जे करायचं आहे ते त्यांनी करावे, न्यायालयावर आमचा विश्वास आहे. न्यायदेवता आम्हाला न्याय देईल याची आम्हाला खात्री आहे.
तपास यंत्रणांचा सरोमिरा कधीही न संपणारा -भाजपात आलेल्या कृपाशंकर सिंह किंवा अन्य नेत्यांवरील केंद्रीय यंत्रणांच्या कारवाई थांबल्या का याबाबत लाड यांना विचारले. त्यावर बोलताना त्यांनी सांगितले की, तपास यंत्रणांचा ससेमिरा हा कधीही न संपणारा असतो. एखाद्या नेत्यावरची कारवाई थांबली असे तुम्हाला कोणी सांगितलं असेल, तर तशी कारवाई थांबत नसते. केंद्रीय तपास यंत्रणांची कारवाई ही 25 - 30 वर्ष सुद्धा चालते. त्याची फाईल न्यायालयातूनच बंद होत असते. त्यामुळे ज्या कोणावर कारवाई झालीय त्यांची कागदपत्रे तापस यंत्रणा ही कायम सुरूच राहते. मुंबईचे पोलीस आयुक्त यांना आमच्यावरील कारवाईसाठी लिस्ट दिली गेली, असा आरोपही लाड यांनी केला आहे.