महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मन की बात थांबवून आता काम की बात करावी, काँग्रेसचा मोदींवर निशाणा - Ratnagiri

या पत्रकार परिषदेत संदीप बी एम यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. "राम मंदिर, काळा पैसा यांसारखे सर्व विषय मोदी विसरले". प्रत्येक निवडणुकीत हे रामाला 5 वर्ष आणखी वनवासात टाकतात. या पाच वर्षात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या होऊनही मोदी यावर काहीच बोलत नाहीत.

मन की बात थांबवून आता काम की बात करावी, काँग्रेसचा मोदींवर निशाणा

By

Published : Apr 13, 2019, 1:25 PM IST

रत्नागिरी -पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मन की बात थांबवून आता काम की बात करावी, असा टोला काँग्रेसचे कोकण विभागाचे प्रभारी संदीप बी एम यांनी लगावला आहे, ते आज रत्नागिरीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. रत्नागिरीतल्या काँग्रेस भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेला खासदार हुसेन दलवाई, आघाडीचे उमेदवार नविनचंद्र बांदिवडेकर, काँग्रेसचे रायगड प्रभारी रमेश किर, राष्ट्रवादी काँग्रेसचे कुमार शेट्ये आदी उपस्थित होते.

या पत्रकार परिषदेत संदीप बी एम यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. "राम मंदिर, काळा पैसा यांसारखे सर्व विषय मोदी विसरले". प्रत्येक निवडणुकीत हे रामाला 5 वर्षे आणखी वनवासात टाकतात. या पाच वर्षांत सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या होऊनही मोदी यावर काहीच बोलत नाहीत. या पाच वर्षांत 17 हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

5 वर्षांत जे जे बोलले त्यातले काहीच केले नाही. दरम्यान शिवसेनेवर टीका करताना ते म्हणाले की शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर प्रत्येक निर्णयाबाबत टीका केली. मात्र, आता खुर्चीची याद आल्यावर रामाला विसरले अशी टीका त्यांनी यावेळी शिवसेनेवर केली.

ABOUT THE AUTHOR

...view details