रत्नागिरी - सलून व्यवसायिकांनी आज (बुधवार) रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले. सलून व ब्युटी पार्लर चालू करण्यासंदर्भात रत्नागिरीचे नाभिक समाज अध्यक्ष श्रीकृष्ण उर्फ बावा चव्हाण यांनी प्रशासनाकडे वेळोवेळी निवेदनाद्वारे मागणी करूनही कोणतीच प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे हताश झालेल्या या व्यवसायिकांनी बुधवारी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले. आमदार राजन साळवी यांनी या उपोषणकर्त्यांची व्यथा जाणून घेत हे व्यवसाय सुरू करण्याची परवानगी मिळण्याची ग्वाही दिली.
सलून व ब्युटी पार्लर व्यवसायिकांचं रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण - सलून न्यूज
सलून व्यवसायिकांनी आज (बुधवार) रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले.
कोविड 19 च्या पार्श्वभूमीमुळे शासनाच्या निर्देशानुसार लॉकडाऊनमुळे संपूर्ण जिल्हा बंद स्थितीत होता. 1 जूननंतर जनजीवन व व्यवसाय हळूहळू पूर्व पदावर येत असताना जिह्यामध्ये सलून व ब्युटी पार्लर सुरू करण्याबाबतचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आलेला नाही. त्यामुळे हातावर पोट असलेल्या नाभिक समाजाचे अतोनात हाल होत आहेत. खबरदारी घेऊन सलून व ब्युटी पार्लर चालू करण्यासंदर्भात प्रशासनाकडे वेळोवेळी मागणी केली. मात्र, प्रशासनस्तरावर त्याची कोणतीच दाद घेतली गेली नाही. त्यामुळे रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले अशी माहिती बावा चव्हाण यांनी दिली.