रत्नागिरी : जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यातील साखरपा जोशीवाडी येथे असणारे धरण मागील काही वर्षांपासून दुरुस्तीच्या प्रतिक्षेत आहे. 2009 पासून या धरणाला गळती आहे. परंतु याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांकडून होत आहे. या धरणाची अशीच परिस्थिती राहिली तर तिवरे धरणाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
साखरपा लघु पाटबंधारे योजनेतंर्गत कोंडगाव आणि साखरप्याच्या सीमेवर साखरपा जोशीवाडी नाल्यावर हे धरण बांधण्यात आले. धरणाचे पाणलोट क्षेत्र 2.978 चौ.कि.मी., धरणाची लांबी 346 मीटर, पूर्ण जलसंचय पातळी 132 मीटर, बर पद्धतीचा सांडवा 33 मीटर, डावा कालवा 3 कि.मी., 260 हेक्टर क्षेत्र सिंचनासाठी धरणाची उंची 32.50 मीटर, सिंचनासाठी पाणी वापर 3.019 द.ल.घ.मी., पिण्यासाठी पाणीवापर 0.348 द.ल.घ.मी., एकूण पाणीसाठा 3.692 द.ल.घ.मी. असे असून यासाठी त्यावेळी 1279.47 लाख रुपये खर्च केले. सहा वर्षांपूर्वी धरणाला गळती लागली होती. त्यावेळी याची डागडुजी केली होती. मात्र, सध्या या धरणाची गळती सुरुच आहे. या धरणामुळे परिसरातील नागरिकांना याचा उत्तम फायदा झाला परंतु अशा प्रकारच्या दुरवस्थेमुळे धोका निर्माण झाला आहे पाणीसाठा कमी असल्याने