महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रत्नागिरी : वायररोपमध्ये अडकलेल्या बिबट्याची वनविभागाकडून सुखरूप सुटका

भक्ष्याच्या शोधात असताना बिबट्या आगरनरळ येथे राहणाऱ्या वासुदेव गोताड यांच्या शेतात लावलेल्या वायररोपमध्ये रात्रीच्या सुमारास अडकला. कटरच्या सहाय्याने वायररोप कापून बिबट्याची सुटका करण्यात आली. सुमारे पाच वर्षाचा हा मादी बिबट्या आहे. या बिबट्याची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

बिबट्याची वनविभागाकडून सुखरूप सुटका
बिबट्याची वनविभागाकडून सुखरूप सुटका

By

Published : Dec 30, 2020, 7:53 PM IST

रत्नागिरी -रत्नागिरी तालुक्यातील आगरनरळ येथे वायररोपमध्ये अडकलेल्या बिबट्याची वनविभागाने सुखरूप सुटका केली आहे. बुधवारी सकाळी ही घटना उघड झाली होती. हा मादी बिबट्या असून त्याला वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

रत्नागिरी : वायररोपमध्ये अडकलेल्या बिबट्याची वनविभागाकडून सुखरूप सुटका
शेतात लावलेल्या वायररोपमध्ये अडकला बिबट्या

भक्ष्याच्या शोधात असताना बिबट्या आगरनरळ येथे राहणाऱ्या वासुदेव गोताड यांच्या शेतात लावलेल्या वायररोपमध्ये रात्रीच्या सुमारास अडकला. येथील ग्रामस्थ सकाळी शेतात गेल्यानंतर त्यांच्या ही गोष्ट लक्षात आली. ग्रामस्थांनी याची माहिती पोलीसपाटलांना दिली. यानंतर त्यांनी जयगड पोलिसांना या घटनेची माहिती दिली.

हेही वाचा -ऊसतोडणीदरम्यान सापडलेल्या बछड्यांची मादीसोबत भेट, निफाडच्या करंजी गावातील घटना


वनविभागाकडून बिबट्याची सुखरूप सुटका

जयगडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांनी रत्नागिरी परिक्षेत्राच्या वन अधिकारी प्रियांका लगड यांना माहिती दिली. लगड यांनी आपल्या सहकाऱ्यांसह पिंजरा घेऊन घटनास्थळी धाव घेतली. बिबट्या वायररोपमध्ये अडकल्याने कटरच्या सहाय्याने वायररोप कापून बिबट्याची सुटका करण्यात आली. सुमारे पाच वर्षाचा हा मादी बिबट्या आहे. या बिबट्याची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.


बिबट्याची सुखरुप सुटका करण्यासाठी विभागीय वन अधिकारी दीपक खाडे , सहाय्यक वनसंरक्षक सचिन निलख यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी परिक्षेत्राच्या वन अधिकारी प्रियंका पंढरीनाथ लगड, वनपाल संगमेश्वर सु. आ. उपरे , म. ग. पाटील, सा. रं. पताडे, वनरक्षक कोले, वि. द. कुंभार, न्हा. सि. गावडे, राहुल गुंठे, सं. म. रणधीर यांनी ही कार्यवाही पार पाडली.

हेही वाचा -कळमनुरी तालुक्यातील कांडलामध्ये पुन्हा आढळला बिबट्या; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

ABOUT THE AUTHOR

...view details