रत्नागिरी - आज बाळासाहेब ठाकरे असते, तर त्यांनीही उद्धव ठाकरे यांना कान धरून उठाबशा काढायला लावल्या असत्या, अशा शब्दांत काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गुजरात दौऱ्यावरून निशाणा साधला. आघाडीचे उमेदवार नविनचंद्र बांदिवडेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला. त्यावेळी सांवत उपस्थित होते.
तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना उठाबशा काढायला लावल्या असत्या - सचिन सावंत - ratnagiri
शाहांचा उमेदवारी अर्ज भरायला जाणे म्हणजे अफजलखानच्या भेटीला शिवसेनेच्या उंदरांची फलटण जाणे, अशा शब्दात सावंत यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
![तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना उठाबशा काढायला लावल्या असत्या - सचिन सावंत](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/images/768-512-2856672-281-1f4c5cec-e608-4cbc-8731-ee5a242b2c5a.jpg)
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गुजरातमध्ये भाजप अध्यक्ष अमित शाह यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गेले होते. मात्र, युती होण्याअगोदर उद्धव ठाकरेंनी विविध मुद्द्यांवरून भाजपवर सडोतोड टीका केली होती. टीका करताना उद्धव यांनी शाहांना अफजलखानची उपमाही दिली होती. त्यानंतर उद्धव ठाकरे अमित शाहांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गुजरातला गेले. परिणामी विरोधक ठाकरेंच्या या दौऱ्यावर जोरदार टीका करत आहेत. शाहांचा उमेदवारी अर्ज भरायला जाणे म्हणजे अफजलखानच्या भेटीला शिवसेनेच्या उंदरांची फलटण जाणे, अशा शब्दात सावंत यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. तसेच आज बाळासाहेब असते, तर त्यांनी उध्दव ठाकरेंचे कान पकडून त्यांना खडसावून उठाबशा काढायला लावल्या असत्या, असा टोलाही सावंत यानी लगावला.