रत्नागिरी- पावसापाठोपाठ आता समुद्रातील लाटांचा फटका मिर्या ते पंधरामाड परिसराला बसत आहे. अजस्त्र लाटांमुळे येथील बंधारा आणि त्यावरील रस्ता पूर्णतः वाहून गेला आहे. शिवाय या लाटांनी घरांचे कठडेही वाहून गेले आहेत.
रत्नागिरीतील पंधरामाड भागात लाटांचे तांडव; धुपप्रतिबंधक बंधारा गेला वाहून - रस्ता पूर्णतः वाहून
मागील आठ दिवसापासून मुसळधार पावसाचा फटका सर्वत्र बसतो आहे. मात्र आता पावसापाठोपाठ समुद्रातील लाटांचाही फटका किनारपट्टीवरील गावांना बसत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील मिर्या पंधरवाडा परिसरातील किनारपट्टीवरील सुरक्षा कठडे वाहून गेले आहे. त्यामुळे नागिरकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
घरांचे कठडेही गेले वाहून
पाणी कधीही नागरी वस्तीत घुसू शकते, अशी स्थिती आहे. त्यामुळे येथील नागरिक भीतीच्या वातावरणात आहेत. पंधरामाड परिसरातील धुपप्रतिबंधक बंधाऱ्यासह रस्ता वाहून गेला आहे.