रत्नागिरी -राजापूर तालुक्यातील काजीर्डा गाव सध्या चर्चेत आलं आहे, ते एका वेगळ्याच गोष्टीमुळे, हे गाव पश्चिम महाराष्ट्राच्या अगदी जवळ आहे. हे गाव निसर्गसंपन्न असून, गावात पर्यटनास मोठा वाव आहे. कार्जीडा घाट हा गाव आणि पश्चिम महाराष्ट्र यामधील दुवा आहे. या घाटातून रस्ता झाल्यास पश्चिम महाराष्ट्र दक्षिण रत्नागिरीच्या आणखी जवळ येईल. या रस्त्यामुळे जवळपास 40 ते 45 किलोमिटरचे अंतर वाचेल. ही गोष्ट लक्षात घेऊन, कार्जीडा गावातील ग्रामस्थ सरसावले आहेत. श्रमदानातून रस्ता तयार करण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेतला आहे. त्यांना यासाठी मनसेची साथ मिळत आहे.
सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं राजापूर तालुक्यातील कार्जीडा गाव, या काजीर्डा घाटातून रस्ता झाल्यास पश्चिम महाराष्ट्रात जाण्यासाठी तो गगनबावडा, भुईबावडा आणि अणुस्कुरा घाटाला पर्याय ठरू शकतो. या गावातील लोकं यापूर्वी अगदी चालत कोल्हापूरच्या बाजारपेठेत जायची. त्यासाठी त्यांना केवळ 3 ते 4 तासांचा वेळ लागायचा. मात्र जर हा रस्ता झाल्यास या गावातून अवघ्या अर्ध्या ते पाऊण तासात वाहनाने कोल्हापूरला जाणे शक्य होणार आहे. दक्षिण रत्नागिरी ते कोल्हापूर हे अंतर जवळपास एक ते दिड तासांनी आणखी कमी होऊ शकतं. 1977-78 साली रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून या रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती, मात्र काम अर्ध्यावरच रखडले.
धरणामुळे रखडला विकास