महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 300 पोती भाताची मदत; रत्नागिरीतील अनोखा उपक्रम - बासुरी फाऊंडेशन-ॲलिकॉन

'क्यार' चक्रीवादळाचा तडाखा, अवकाळी पाऊस, अशा अस्मानी संकटात कोकणातला शेतकरी भरडला गेला. कोकणात भात हे मुख्य पीक आहे. पण अनेक ठिकाणी हे पीक पावसामुळे सडले आहे. शासनाकडून तुटपुंजी मदत जाहीर केली गेली. मात्र, ती अजून मिळाली नाही. त्यामुळे शेकऱ्यांच्या मदतीसाठी अनोखा उपक्रम राबवण्यात आला आहे.

rice-giving-to-the-wet-drought-affected-farmers-in-ratnagiri
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 300 मण तांदळाची मदत

By

Published : Dec 11, 2019, 9:35 AM IST

Updated : Dec 11, 2019, 11:19 AM IST

रत्नागिरी- कोकणातील बहुसंख्य शेतकऱ्यांच्या उपजीविकेचे साधन भातशेती आहे. मात्र, चक्रीवादळाच्या प्रभावाने आणि निसर्गाच्या कोपाने कोकणातल्या शेतकऱ्यांवर संकट कोसळले. सरकारी पंचनामे रंगवले गेले, मदतीसाठी पॅकेज सुद्धा घोषित झाले. परंतु, आजही कोकणातला शेतकरी सरकारी मदतीशिवाय वंचित आहे. याच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी अनोखी मदत करण्यात आली आहे. संगमेश्वर तालुक्यातील तीन गावातील ८० नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तब्बल ३०० मण (साधारणत: 300 पोती) तांदळाच्या स्वरुपात थेट भरपाई दिली गेली.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 300 मण तांदळाची मदत

हेही वाचा-शेतकरी, शेतमजूरसह महिलांच्या विविध प्रश्‍नांसाठी आझाद मैदान येथे आंदोलन

'क्यार' चक्रीवादळाचा तडाखा, अवकाळी पाऊस, अशा आस्मानी संकटात कोकणातला शेतकरी भरडला गेला. कोकणात भात (तांदुळ) हे मुख्य पीक आहे. पण अनेक ठिकाणी हे पीक पावसामुळे सडले आहे. शासनाकडून तुटपुंजी मदत जाहीर केली गेली. मात्र, ती अजून मिळाली नाही. त्यामुळे शेकऱ्यांच्या मदतीसाठी अनोखा उपक्रम राबवण्यात आला आहे. संगमेश्वर तालुक्यातील राजवाडी, धामणी आणि चिखली गावातील ५० टक्यांहून अधिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी पुण्यातील बासुरी फाऊंडेशन-ॲलिकॉन आणि राजवाडीतील पीपल्स एम्पावरिंग मुव्हमेंट (पेम) ही संस्था मदतीसाठी पुढे आली. भाताचे मोठे नुकसान झाल्याने कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी या शेतकऱ्यांना खुल्या बाजारातून चढ्या दराने भात विकत घ्यावे लागणार होते. ही समस्या लक्षात घेऊन या दोन संस्थांनी शेतकऱ्यांना भाताच्या स्वरूपात थेट भरपाई देण्याची अभिनव योजना आखली.


ही योजना तयार करण्यापूर्वी पेमसंस्थेतर्फे तीन गावात सर्वेक्षण करण्यात आले. सरासरी वार्षिक उत्पन्नाच्या तुलनेत ज्या शेतकऱ्यांचे यंदा सुमारे चाळीस ते पन्नास टक्के नुकसान झाले. त्यांना मदत देण्यात आली. विशेष म्हणजे जे दुबार शेती करतात त्यांनाच ही मदत दिली गेली. सरकारी मदतीची वाट न पाहता आणि पैशाची मतद न करता नुकसान झालेल्या भाताची नुकसान भरपाई आज ८० शेतकऱ्यांना दिली गेली. संतोष भडवळकर आणि विलास गोवले या दोन शेतकऱ्यांच मोठे नुकसान झाले होते त्यांना ही मदत करण्यात आली आहे.

Last Updated : Dec 11, 2019, 11:19 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details