रत्नागिरी - सततच्या पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील भात पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करून तत्काळ नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी आमदार उदय सामंत यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
भातशेती हे रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे महत्त्वाचे पीक असल्याने या शेतीवर अवलंबून असणारा शेतकरीवर्गाची येथे जास्त संख्या आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने दिलासा मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी भातशेतीच्या नुकसानीबाबत राज्य शासनाला तातडीने कळवावे. शेतीचे पंचनामे करून नुकसानभरपाई मिळण्यासाठी तातडीने पाठपुरावा करावा, अशी मागणी आमदार उदय सामंत यांनी केली आहे.