महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वीज बिलात जोपर्यंत तफावत येत नाही, तोपर्यंत एकही रुपया न देण्याचा ठराव

सन 2014 मध्ये तत्कालीन नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांच्या कार्यकाळात पथदीप एलईडी बसवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यावेळी रत्नागिरीसह राज्यातील चार शहरांची या योजनेसाठी निवड झाली होती. एलईडी बल्बमुळे पालिकेचे वीजबिलही कमी येणार असल्याचे त्यावेळी सांगण्यात आले होते. मात्र कपात होण्याऐवजी वीजबिल वाढून येत आहे.

विजबिलात जोपर्यंत तफावत येत नाही
विजबिलात जोपर्यंत तफावत येत नाही

By

Published : Jan 30, 2021, 8:13 AM IST

रत्नागिरी -शहरातील एलईडी पथदिव्यांमुळे महिन्याला येणारे 16 लाखांच्या वीजबिलात सुमारे 35 टक्के कपात होईल असे सांगण्यात आले होते. मात्र कपात होण्याऐवजी वीजबिल वाढून येत आहे. त्यामुळे जोपर्यंत वीजबिलात तफावत येत नाही, तोपर्यंत एकही रुपया न देण्याचा ठराव नगर परिषदेच्या सभेत करण्यात आला आहे.

2014 मध्ये बसवण्यात आले होते एलईडी पथदिवे
रत्नागिरी शहरात सन 2014 मध्ये तत्कालीन नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांच्या कार्यकाळात पथदीप एलईडी बसवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यावेळी रत्नागिरीसह राज्यातील चार शहरांची या योजनेसाठी निवड झाली होती. एलईडी बल्बमुळे पालिकेचे वीजबिलही कमी येणार असल्याचे त्यावेळी सांगण्यात आले होते. रत्नागिरी शहरात पालिकेतर्फे देखभाल केले जाणारे व महावितरणकडून देखभाल होणारे असे साडेचार हजार पथदिवे आहेत. या सर्व पथदिव्यांची जागा त्यानंतर झालेल्या कार्यवाहीत एलईडी पथदिव्यांनी घेतली. साधारणपणे 36 ते 40 किंवा अन्यत्र आवश्यकतेनुसारच्या क्षमतेचे एलईडी बसवण्यात आले.

एलईडी पथदिवे बसवल्यानंतर या वीजबिलात 30-35 टक्के कपात होणार असे त्यावेळी सांगण्यात आले होते. हा नगर परिषदेचा फायदाच असून, सात वर्षांत पथदीपांची देखभाल पूर्णत: कंपनी पाहणार असल्याचे सांगण्यात आले होते. नगर परिषद हद्दीतील पथदिवे बसवण्याचे काम ईईएसएल कंपनीमार्फत केले आहे. मात्र जुलै 2019 ते ऑक्टोबर 2020 या कालावधीतील रक्कम रुपये 78 लाख 28,568 रुपयांची देयके तात्काळ अदा करण्याबाबत नगरविकास सहसचिव महाराष्ट्र शासन यांनी आदेश दिलेला आहे. जोपर्यंत वीजबिलात तफावत येत नाही. तोपर्यंत एकही रुपया न देण्याचा ठराव नगर परिषदेच्या सभेत करण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details