रत्नागिरी -डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत येणाऱ्या संशोधन केंद्रांमध्ये गेल्या काही वर्षात भाताच्या नवनवीन जातींवर संशोधन करून त्या विकसित करण्यात आल्या आहेत. त्याचा शेतकऱ्यांना चांगला फायदाही होत आहे. याच ठिकाणी सध्या ब्लॅक राईसवर संशोधन सुरू आहे. येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना याचा फायदा होऊ शकतो.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत शिरगाव येथील कृषी संशोधन केंद्रात सध्या 'ब्लॅक राईस'वर संशोधन सुरू आहे. कोकणातील हवामानात हे बियाणे चांगल्याप्रकारे कसे येऊ शकेल आणि कोकणातील शेतकऱ्यांना त्याचा कसा फायदा होईल यासाठी हे संशोधन सुरू आहे. पूर्णतः काळे व जाड असणारे हे बियाणे येथील संशोधन केंद्रात वरच्या बाजूने पांढरे, आतमध्ये काळ्या रंगाचे व बारीक कसे करता येईल यावर संशोधन सुरू आहे. गेल्या वर्षाभरापासून हे संशोधन सुरू आहे. कृषी केंद्राच्या शेतावर भात लावणीपासून ते त्यांचा जेनेटिक व्हेरिएशनमध्ये बदल करण्याचे काम सुरू आहे. हे बियाणे शेतात खूप उंच वाढते. याचा उपयोग करून कोकणात संशोधन केंद्राने पांढऱ्या भातासारखे व बारीक बियाणे तयार करण्यावर भर दिला आहे. या सर्व कामात संशोधन केंद्राचे तज्ज्ञ व कर्मचारी सक्रिय आहेत. संशोधन सुरू असलेल्या या बारीक दाण्याच्या ब्लॅक राईसचे बियाणे शेतकऱ्यांना पुढील एक ते दोन वर्षांत उपलब्ध होईल, अशी माहिती शिरगाव कृषी संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी भरत वाघमोडे यांनी दिली.
ब्लॅक राईसची वैशिष्ट्ये -