महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रत्नागिरी : मुरुड समुद्रकिनारी जाळ्यात अडकलेल्या कासवाला दिले जीवनदान - मुरुड समुद्रकिनारी

राज साळवी, रोशन जाधव, ओंकार जाधव आणि ग्रामसुरक्षा दलाचे सदस्यांनी नेहमीप्रमाणे किनारपट्टीवर फेरफटका मारून किनारपट्टीची पाहणी करत होते. यावेळी त्यांना कासव जाळ्यात अडकलेले दिसले. याचवेळी सर्व जाळे कापून कासवाला सोडवले आणि तसेच पुन्हा समुद्रात सोडले.

कासवाला दिले जीवनदान
कासवाला दिले जीवनदान

By

Published : May 31, 2021, 4:41 PM IST

Updated : May 31, 2021, 5:28 PM IST

रत्नागिरी -दापोली तालुक्यातील मुरुड येथील समुद्र किनाऱ्यावर जाळ्यात अडकलेल्या ऑलिव्ह रिडले कासवाची सुटका केली आहे. शिवाय त्याला जीवनदान देण्यात ग्रामसुरक्षा दलाचे सदस्य व ग्रामस्थांना यश आले आहे.

जाळ्यात अडकलेल्या कासवाला दिले जीवनदान
जाळ्यातून सुखरूप सुटका

मुरुड किनाऱ्यावर दरवर्षी ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांच्या अनेक माद्या अंडी घालण्यासाठी येण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यांचे संरक्षण करून येथील ग्रामस्थ त्या अंड्यामधून बाहेर येणाऱ्या पिल्लांना सुरक्षित पुन्हा पाण्यात सोडण्याचे काम करतात. याच जातीचे कासव मुरुड समुद्रकिनारी पूर्णपणे जाळ्यात फसलेले दिसून आले. राज साळवी, रोशन जाधव, ओंकार जाधव आणि ग्रामसुरक्षा दलाचे सदस्यांनी नेहमीप्रमाणे किनारपट्टीवर फेरफटका मारून किनारपट्टीची पाहणी करत होते. यावेळी त्यांना कासव जाळ्यात अडकलेले दिसले. याचवेळी सर्व जाळे कापून कासवाला सोडवले आणि तसेच पुन्हा समुद्रात सोडले. त्यामुळे परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे. दरम्यान गेल्यावर्षी अशाच प्रकारे जाळ्यात अडकलेली चार कासवांना सोडण्या आले होते.

हेही वाचा-विरोधकांना सत्ता गेल्याचे पचले व पटलेले नाही, हसन मुश्रीफांची टीका

Last Updated : May 31, 2021, 5:28 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details