महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Heavy Rains Ratnagiri : रत्नागिरीत संततधार सुरुच; पुढील 48 तासांसाठी रेड अलर्ट जारी - 48 तासांसाठी रत्नागिरीत रेड अलर्ट

रत्नागिरीत सध्या मुसळधार पाऊस बरसतो ( Heavy Rains Ratnagiri ) आहे. अशात पावसाचा शेती पिकांना मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यासाठी पुढील 48 तास रेड अलर्ट घोषित करण्यात आला असून, त्यापुढे तीन दिवस ऑरेंज अलर्ट राहणार आहे. नागरिकांनी या काळात खबरदारी घ्यावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. गे

मुसळधार पाऊस
मुसळधार पाऊस

By

Published : Aug 7, 2022, 4:43 PM IST

Updated : Aug 7, 2022, 5:18 PM IST

रत्नागिरी -रत्नागिरी जिल्ह्यात सध्या मुसळधार ( Heavy Rains Ratnagiri ) पाऊस बरसतो आहे. या पावसाचा फटका जिल्ह्यातील शेती परिसर आणि सखल भागातील अनेक ठिकाणाला बसला आहे. दरम्यान जिल्ह्यासाठी पुढील 48 तास रेड अलर्ट घोषित करण्यात आला असून, त्यापुढे तीन दिवस ऑरेंज अलर्ट राहणार आहे. नागरिकांनी या काळात खबरदारी घ्यावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. गेल्या 24 तासांत जिल्ह्यात 83.33 मिमी पावसाची नोंद झाली आहे. संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा, राजापूर या तालुक्यांमध्ये 100 मिमी पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे.

रत्नागिरीत मुसळधार पाऊस


मुसळधार पावसामुळे गुहागरमधील शृंगारतळी येथे पावसामुळे गटाराचे पाणी रस्त्यावर आल्याने अनेक दुकानात पाणी शिरले आहे. त्यामुळे रस्त्याला नदीचे स्वरूप आले आहे. गुहागर तालुक्यांतील देवघर येथील मिलिंद म्हामुनकर यांच्या घरात रस्त्याच्या शेजारील गटाराचे पाणी शिरल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे खेड तालुक्यातील जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडल्याने या ठिकाणी प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला आहे. तर रत्नागिरीतील भंडारपुळे येथील पुलावरून पाणी वाहू लागल्याने हा रस्ता प्रशासनाने तात्पुरता बंद केला आहे. त्यामुळे रत्नागिरी-गणपतीपुळे मार्गावरची वाहतूक बंद झाली आहे. कोतळूक कासारी नदी प्रथमच पात्राबाहेर आली आहे. नदी लगतची भात शेती पाण्याखाली गेली आहे. सततच्या पावसामुळे गुहागर तालुक्यातील साखरी त्रिशूळ येथे दरड कोसळली असून तहसीलदार व इतर अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसेच सततच्या पावसामुळे गुहागर तालुक्यातील असगोली गावाजवळ भात शेतीमध्ये पाणी शिरले आहे. तसेच पुलावर पाणी असल्याने वाहतूक बंद झाली आहे.

हेही वाचा -Sindhudurg Flood : सिंधुदुर्गमध्ये पूरपरिस्थिती; अतिवृष्टीमुळे ५० लाखांचे नुकसान

Last Updated : Aug 7, 2022, 5:18 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details