महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रत्नागिरी जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा, 'रेड अलर्ट' जारी

रत्नागिरी जिल्ह्यात दोन दिवस अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

File photo
File photo

By

Published : Jul 14, 2020, 4:27 PM IST

रत्नागिरी - जिल्ह्यात रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्यात उद्या (दि.15 जुलैै) अतिवृष्टी होण्याची शक्यता असून जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे .

जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मंगळवार आणि बुधवार दोन दिवस अशीच परिस्थिती राहणार असून बुधवारी काही भागांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे. या काळात जिल्ह्यात 200 मिमीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज असून रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. यासाठी नौदल, तटरक्षक दल, राष्ट्रीय आपत्ती निवारण दल तसेच स्थानिक प्रशासनाला सज्ज राहण्यास सांगितले आहे.


जुलैच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यानंतर मात्र पावसाने काहीशी विश्रांती घेतली होती. मात्र पुन्हा एकदा पाऊस सक्रिय होताना दिसत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पावसानेे आजपर्यंत सरासरी पंधराशे मिलिमिटरचा टप्पा ओलांडला आहे. गेल्या चोविस तासात रत्नागिरी जिल्ह्यात दापोली तालुक्यात 60 मिलिमिटर पाऊस झाला आहे. त्याखालोखाल गुहागरमध्ये 53 मिलिमिटर पाऊस झाला आहे. या पावासानेे नद्यांच्या पाणीपातळीतही वाढ झाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details