महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रत्नागिरी तालुक्यात विक्रमी पावसाची नोंद; अवघ्या 2 तासात 9 इंचापेक्षा अधिक पाऊस - ratnagiri latest news

रत्नागिरी तालुक्यात अवघ्या 2 तासात 9 इंचापेक्षा अधिक पाऊस पडला आहे. शुक्रवारी रात्री रत्नागिरी शहर आणि परिसरात मान्सूनच्या पहिल्या पावसाने दमदार हजेरी लावली.

record break rain in ratnagiri taluka
रत्नागिरी तालुक्यात विक्रमी पावसाची नोंद; अवघ्या 2 तासात 9 इंचापेक्षा अधिक पाऊस

By

Published : Jun 13, 2020, 1:56 PM IST

रत्नागिरी - जिल्ह्यात शुक्रवारी रात्री मुसळधार पाऊस झाला. यात रत्नागिरी तालुक्यात विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. रत्नागिरी तालुक्यात अवघ्या 2 तासात 9 इंचापेक्षा अधिक पाऊस पडला आहे.

शुक्रवारी रात्री रत्नागिरी शहर आणि परिसरात मान्सूनच्या पहिल्या पावसाने हजेरी लावली. अवघ्या दोन तासांच्या कालावधीत रत्नागिरी 237 मिलीमीटर पाऊस झाला. यामुळे शहरातील अनेक भाग जलमय झाले होते.

रत्नागिरी तालुक्यात विक्रमी पावसाची नोंद...

गेल्या 24 तासांत जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस रत्नागिरी तालुक्यात 237 मिलीमीटर नोंदला गेला. त्या खालोखाल राजापूर तालुक्यात 160 मिलीमीटर पावसाची नोंद झाली, तर मंडणगडमध्ये 12 मिमी, दापोली 33, खेड 9, गुहागर 58, चिपळूण 33, संगमेश्वर 28, लांजा 59 मिमी पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, नैऋत्य मोसमी पावसाचे रत्नागिरी जिल्ह्यात आगमन झाल्यानंतर सर्वच ठिकाणी पावसाने हजेरी लावली असून जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे.

हेही वाचा -#NisargaCyclone: कासवांच्या गावाची अपरिमित हानी; निसर्गाने दिलेलं 'निसर्ग'नेच नेलं ओढून

हेही वाचा -निसर्ग चक्रीवादळात घर पडल्याने नवजात बालकासह कुटुंबाला राहावं लागतंय शाळेच्या इमारतीत

ABOUT THE AUTHOR

...view details