रत्नागिरी -संततधार पावसामुळे सलग दुसऱ्या दिवशी राजापूर शहराला पुराने वेढले आहे. अर्जुना-कोदवली नद्यांना आलेल्या पुराचे पाणी शहरातील जवाहर चौकापर्यंत पोहचले आहे. पूरस्थितीमुळे शहरासह नदीकाठच्या ग्रामीण भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे.
सलग दुसऱ्या दिवशी राजापूर शहराला पुराचा वेढा; जनजीवन विस्कळीत - शिवाजीपथ रत्नागिरी
संततधार पावसामुळे सलग दुसऱ्या दिवशी राजापूर शहराला पुराने वेढले आहे. अर्जुना-कोदवली नद्यांना आलेल्या पुराचे पाणी शहरातील जवाहर चौकापर्यंत पोहचले आहे. पूरस्थितीमुळे शहरासह नदीकाठच्या ग्रामीण भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे.
सलग दुसऱ्या दिवशी राजापूर शहराला पुराचा वेढा
चोवीस तासांचा कालावधी उलटला तरी पूरस्थिती जैसे थे आहे. राजापूर शहरातील शिवाजीपथ, मच्छिमार्केट, वरची पेठ परिसर पाण्याखाली गेला आहे. कोंढेतड पुलही पाण्याखाली आहे. या भागातील लोकांना पुलावरून धोका पत्करून शहरात यावे लागत आहे. शहरानजीकचा शीळ,गोठणे आणि दोनीवडे मार्गही पुराच्या पाण्याखाली आहे. त्यामुळे या गावांकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.