रत्नागिरी -पाणी पातळी खालावल्याने रत्नागिरी जिल्ह्यात अनेक गावांमध्ये भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. अनेक विहिरींनी तळ गाठला आहे. त्यामुळे अनेकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. जिल्ह्यातल्या 53 गावांमधील 105 वाड्यांना सध्या टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत असल्याची माहिती पालकमंत्री रवींद्र वाईकर यांनीच दिली आहे.
पिण्याच्या पाण्यापासून कोणीही वंचित राहणार याची दक्षता घ्या - रविंद्र वायकर - review
कोकणात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असतानाही जिल्ह्यात काही ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा करण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पाण्यापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र वायकर यांनी सांगितले. पाणी टंचाई व दुष्काळी परिस्थितीचा नुकताच त्यांनी आढावा घेतला.

यावेळी त्यांनी जिल्ह्यातील ग्रामीण व शहरीभागातील पाणी टंचाई व पाणी पुरवठा या बाबत संबधित अधिकाऱ्याशी तालुकानिहाय चर्चा करुन आढावा घेतला. जिल्ह्यामध्ये पाण्यापासून कोणीही वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या, आवश्यक असेल तेथे पाणीपुरवठा करा, लोकांना त्रास होणार नाही असे पाहा, त्यासाठी लागेल ते करा अशा सूचना यावेळी त्यांनी दिल्या. जिल्ह्यातील धरणांची सद्यस्थितीबाबतचा अहवाल सादर करण्याच्या सूचना त्यांनी संबधिताना यावेळी केल्या. रत्नागिरी जिल्ह्यातील पाणी टंचाईने ग्रस्त असलेली 53 गावे टँकरमुक्त करु असे उद्दीष्ट सर्वांनी घेऊया असे आवाहन त्यांनी यावेळी केले.