रत्नागिरी जिल्हा परिषदेकडून मालमत्तांचे सातबारे शोधण्याची मोहीम सुरू - जिल्हा परिषद
जिल्ह्यातील अनेक शाळा, शासकीय कार्यालयांच्या इमारती, अंगणवाडी इमारती आणि ग्रामीण पाणी पुरवठा योजनांच्या विहिरी अद्यापही खासगी किंवा स्थानिक संस्थाच्या नावे आहेत. या ठिकाणी शासकीय निधी खर्च करताना अडचणी उद्भवत आहेत. यामुळे जिल्हा परिषदेकडून मालमत्तांचे सातबारे शोधण्याची मोहिम सुरू करण्यात आली आहे.

रत्नागिरी- जिल्हा परिषदेकडून सध्या मालमत्तांचे सातबारे शोधण्याची मोहिम आखण्यात आली आहे. त्यामध्ये अनेक सातबारे खासगी व्यक्ती अथवा स्थानिक संस्थांच्या नावावर असल्याचे पुढे येत आहे. जिल्ह्यातील अनेक शाळा, शासकीय कार्यालयांच्या इमारती, अंगणवाडी इमारती आणि ग्रामीण पाणी पुरवठा योजनांच्या विहिरी अद्यापही खासगी किंवा स्थानिक संस्थाच्या नावे आहेत. या ठिकाणी शासकीय निधी खर्च करताना अडचणी उद्भवत आहेत. त्यामुळे अशा मालमत्तांचा शोध घेऊन त्या जिल्हा परिषद अथवा ग्रामपंचायतींच्या नावावर करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.