महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रत्नागिरी हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता आणि यापुढेही राहिल - शिवसेना उपनेते राजन साळवी - Ratnagiri was Shiv Senas stronghold

रत्नागिरी जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता (Ratnagiri was Shiv Senas stronghold ) आणि यापुढेही बालेकिल्लाच राहिल ( will continue to be so) असा विश्वास आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांनी व्यक्त केला आहे. कोकणातील कडवट शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांची उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांचे शिवसैनिकांकडून जंगी स्वागत करण्यात आले.

Rajan Salvi
शिवसेना उपनेते राजन साळवी

By

Published : Jul 9, 2022, 7:54 PM IST

रत्नागिरी:आमदार साळवी (Rajan Salvi) यांनी पत्रकारांशी संवाद साधत शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे यांचे आभार मानले आहेत. शिवसेना हा केवळ राजकीय पक्ष नाही. हि विचारांची चळवळ आहे. वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ज्वलंत विचार पुढे घेवून जाणारी हि चळवळ आहे. त्यामुळे ती कधीही संपणार नाही. बाळासाहेबांचे विचार नेते, लोकप्रतिनिधी नव्हे तर सर्वसामन्य शिवसैनिक पुढे घेवून जात आहे. त्यामुळे शिवसेना संघटन दिवसेंदिवस अधिकच मजबूत होत जाईल असा विश्वास साळवी ययांनी व्यक्त केला. कोण इकडचा तिकडे गेला म्हणून शिवसेने संपत नसते. शिवसेना हा विचार ग्रामीण भागासह तळागाळात रुजलेला आहे. जिल्ह्यात संघटना मजबूत आहे. हा बालेकिल्ला आजही आहे ( (Ratnagiri was Shiv Senas stronghold ) ) उद्याही राहिल.

संघटन बांधणी करणे हे शिवसैनिकांच्या रक्तात आहे. त्यामुळे संघटनेची बांधणी कायम सुरुच असते.ती नव्याने करण्याची आवश्यकता नाही.जिल्ह्यातील सर्व शिवसैनिक पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबतच असल्याचा विश्वास आमदार साळवी यांनी व्यक्त केला. अप्पा साळवी, अण्णा सावंत, राजन सावंत, शिरिष जैतपाल, सतिश नाईक, प्रमोद शेरे यांच्या सारख्या शिवसेनेशी निष्ठावांन शिवसैनिकांनी जिल्ह्यात पक्षाची पाळेमुळे रुजवली आहे. त्याचे बोट धरुन मी शिवसेनेत आलो. पक्षाने मला नगरसेवक, नगराध्यक्ष,जिल्हा प्रमुख, आमदार केले. आता तर पक्ष प्रमुख ना.ठाकरे यांनी उपनेते पदाचा सोनेरी मुकूट डोक्यावर बसवला आहे. हे केवळ शिवसेनेतच होवू शकते हे जनतेसमोर आल्याचे आ. साळवी यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details