महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रत्नागिरी : लोटे परिसरात अद्ययावत दोन कोविड सेंटर रुग्णांच्या सेवेत, सुप्रिया लाईफसेन्सचा पुढाकार

एकीकडे कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अनेक ठिकाणी बेडची कमतरता जाणवते. मात्र लोटे परिसरातील रुग्णांची हेळसांड होऊ नये, या उद्देशाने खेड तालुक्यातील लोटे परिसरात अद्ययावत दोन कोविड सेंटर रुग्णांच्या सेवेत दाखल झाली आहेत. सुप्रिया लाईफसेन्स लिमिटेडचे चेअरमन तथा कोकणातील सुप्रसिध्द उद्योगपती सतीश वाघ यांच्या पुढाकारातून ही दोन कोविड सेंटर उभी राहिली आहेत

ratnagiri-two-covid-centers
ratnagiri-two-covid-centers

By

Published : May 12, 2021, 10:03 PM IST

Updated : May 12, 2021, 10:21 PM IST

रत्नागिरी -एकीकडे कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अनेक ठिकाणी बेडची कमतरता जाणवते. मात्र लोटे परिसरातील रुग्णांची हेळसांड होऊ नये, या उद्देशाने खेड तालुक्यातील लोटे परिसरात अद्ययावत दोन कोविड सेंटर रुग्णांच्या सेवेत दाखल झाली आहेत. सुप्रिया लाईफसेन्स लिमिटेडचे चेअरमन तथा कोकणातील सुप्रसिध्द उद्योगपती सतीश वाघ यांच्या पुढाकारातून ही दोन कोविड सेंटर उभी राहिली आहेत. या दोन्ही कोविड सेंटरचे उद्घाटन शिवसेना प्रवक्ते आमदार भास्कर जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.

लोटे परिसरात अद्ययावत दोन कोविड सेंटर रुग्णांच्या सेवेत
सुप्रिया लाईफसायन्स कंपनीच्या सीएसआर फंडातून ५० लाख -
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे संचलित परशुराम हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, घाणेखुंट येथे लोटे औद्योगिक क्षेत्रातील सुप्रिया लाईफसायन्स कंपनीचे मालक सतीश वाघ यांच्या भरीव योगदानातून उभे राहिले आहे. या कोविड सेंटरसाठी सतीश वाघ यांनी कंपनीच्या सीएसआर फंडातून सुमारे ५० लाख रुपयांचे भरीव योगदान दिले आहे. तर हॉटेल वक्रतुंड येथे डॉ. गौड यांच्या माध्यमातून सुसज्ज असे कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. ही दोन्ही कोविड सेंटर प्रत्येकी ३० बेडची असून आमदार भास्कर जाधव यांच्या हस्ते उद्घाटन होऊन ती कार्यरत करण्यात आली आहेत.
दोन्ही कोविड सेंटर अद्ययावत -
दोन्ही कोविड सेंटरमध्ये आवश्यक अशा सोयीसुविधा उपलब्ध आहेत. एमडी फिजिशियनसह अन्य तज्ञ डाॅक्टरांची आणि नर्स व अन्य कर्मचाऱ्यांची फौज सेवेत आहेत. येथील पंचक्रोशीतील ग्रामस्थांना आमदार भास्करराव जाधव, सतीश वाघ यांच्या रूपाने देवदूत मिळाल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. दरम्यान लोटे औद्योगिक वसाहत आणि परिसरातील मंडळी करीता लवकरच येथे शंभर बेडचे कायमस्वरूपी सुसज्ज असे सुंदर हॉस्पिटल उभारण्यात येणार आहे अशी घोषणा सुप्रिया लाईफसेन्स लिमिटेडचेचेअरमन सतीश वाघ यांनी यावेळी केली.
Last Updated : May 12, 2021, 10:21 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details