महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रत्नागिरीत १३ नवीन रुग्णांसह कोरोनाबाधितांची संख्या ३३४ वर

रत्नागिरीत आज १३ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. या नव्या रुग्णांसह जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ३३४ वर पोहोचली आहे.

Ratnagiri corona update
रत्नागिरीत १३ नवीन रुग्णांसह कोरोनाबाधितांची संख्या ३३४वर

By

Published : Jun 4, 2020, 7:08 PM IST

रत्नागिरी - जिल्ह्यात आज आणखी १३ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये गुहागर येथील २, कळंबणी ४, कामथे ३, रत्नागिरी १, संगमेश्वर येथील ३ रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ३३४ वर पोहोचली आहे. तसेच एकाचा काल बुधवारी मृत्यू झाला.

दरम्यान, आज आणखी चार रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे बरे झालेल्यांची संख्या १२५वर गेली आहे. या सर्वांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर आजपर्यंत एकूण ११ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता कोरोनाचे एकूण १९८ ॲक्टीव्ह रुग्ण आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details