महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रत्नागिरीत 24 तासात सरासरी 93.44 मिलीमीटर पाऊस; वादळी वाऱ्यांसह पावसाचा जोर कायम - ratnagiri rains

मागील दोन दिवसांपासून संपूर्ण जिल्ह्याला वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने झोडपलं आहे. त्यानंतर आजही (गुरुवार) मुसळधार पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली.

monsoon in ratnagiri
मागील दोन दिवसांपासून संपूर्ण जिल्ह्याला वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने झोडपलं आहे.

By

Published : Jun 4, 2020, 4:47 PM IST

रत्नागिरी -मागील दोन दिवसांपासूनसंपूर्ण जिल्ह्याला वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने झोडपलं आहे. त्यानंतर आजही (गुरुवार) मुसळधार पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली. सकाळपासून सूर्यप्रकाश होता. मात्र दुपारनंतर जोरदार पावसाला सुरुवात झाली. दापोली, गुहागरमध्येही काही ठिकाणी मुसळधार पाऊस बरसला असून काही ठिकाणी जोरदार वाराही होता. त्यामुळे पंचनामे करण्यात काही ठिकाणी अडथळे येत होते.

मागील दोन दिवसांपासून संपूर्ण जिल्ह्याला वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने झोडपलं आहे.
24 तासात जिल्ह्यात सरासरी 93.44 मिलीमीटर पाऊस
रत्नागिरीत गेल्या 24 तासात 93.44 मिलीमीटर सरासरी पाऊस झाला आहे. यामध्ये मंडणगड, दापोली तसेच चिपळूण या तीन तालुक्यांमध्ये 100 मिमी पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. मंडणगड 130 मिमी, दापोली 125, खेड 76, गुहागर 77, चिपळूण 102, संगमेश्वर 73, रत्नागिरी 40, लांजा 131, राजापूर 87 मिमी पावसाची नोंद गेल्या 24 तासात झाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details