रत्नागिरी - जिल्ह्यात दरड कोसळण्याचे सत्र पुन्हा एकदा सुरू झाले आहे. राजापूर तालुक्यातील मूर-तळवडे रस्त्यावर मध्यरात्री दरड कोसळल्याने जामदा खोऱ्यातील काही गावांचा संपर्क तुटला आहे. यामध्ये मूर, काजीर्डा, कोळंब, वाळवंड, सावडाव जवळेथर, आजीवली, नेर्ले, जांभवडे अशा गावांचा समावेश आहे.
राजापुरातील मूर-तळवडे रस्त्यावर दरड कोसळली; जामदा खोऱ्यातील गावांचा संपर्क तुटला - moore talwade landslide
सध्या दरड बाजूला करण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहे. ऐन गणेशोत्सवात अशा घटना घडत असल्याने भाविकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. दरड कोसळल्यामुळे स्थानिक वाहतुकीला अडथळा होत आहे.
दरड
सध्या दरड बाजूला करण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. ऐन गणेशोत्सवात अशा घटना घडत असल्याने भाविकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. दरड कोसळल्यामुळे स्थानिक वाहतुकीला अडथळा होत आहे.
हेही वाचा - लंडन : पाक समर्थकांचा भारतीय उच्चायुक्तालयासमोर हैदोस; अंडी, दगडफेक करत फोडल्या काचा
Last Updated : Sep 4, 2019, 12:54 PM IST