महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Shashikant Warishe Accidental Case : शशिकांत वारीसे यांच्या मृत्यूप्रकरणी पंढरीनाथ आंबेरकर याच्याविरुद्ध 302 अन्वये गुन्हा - Shashikant Warishe Accidental Death Case

पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणी पंढरीनाथ आंबेरकर याच्यावर भादवी कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.धनंजय कुलकर्णी यांनी माहिती दिली आहे. पंढरीनाथ आंबेरकर यांना दिलेल्या जबाबावरून हे कलम लावण्याच आल्याचे कुलकर्णी म्हणाले. तसेच कलम लावण्याचा अवहाल न्यायालयाला सादर करण्यार असल्याचे म्हटले आहे.

Shashikant Warishe Accidental Case
Shashikant Warishe Accidental Case

By

Published : Feb 9, 2023, 4:18 PM IST

पोलीस अधीक्षक डॉ.धनंजय कुलकर्णी

रत्नागिरी :पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणी अटकेत असलेला महिंद्रा थारचा चालक पंढरीनाथ आंबेरकर याच्यावर भादवी कलम 302 लावण्यात आले आहे. फिर्यादीने दिलेल्या पुरवणी जबाबावरून हे कलम वाढविण्यात आले असून तसा अहवाल माननीय कोर्टला सादर केला असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. धनंजय कुलकर्णी यांनी दिली आहे.

वारीशे दुचाकीला अपघात : अपघात राजापूर कोदवली येथील पेट्रोलपंपाजवळ सोमवारी दुपारी थार गाडी आणि वारीशे यांच्या दुचाकीमध्ये अपघात झाला होता. त्यामध्ये पत्रकार शशिकांत वारीशे गंभीर जखमी झाले होते. कोल्हापूर येथील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु असताना त्यांचे निधन झाले होते.

सात दिवसांची पोलीस कोठडी :त्या अपघातानंतर मृत्युमुखी पडलेले पत्रकार शशिकांत वारीशे यांचे मेहुणे अरविंद दामोदर नागले यानी राजापूर पोलासात दाखल केली होती. त्यांनी केलेल्या तक्रारीनुसार राजापूर पोलिसानी थार गाडीचा चालक पंढरीनाथ विद्याधर आंबेरकर याच्यावर भादवि कलम 308 , तसेच सदोष मनुष्यवधाचे कलम 304 अन्वये गुन्हा दाखल केला होता. त्याला अटक करुन न्यायालयात हजर केल्यानंतर सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली होती.

कलम 302 लावण्याची मागणी : अपघातास कारणीभूत ठरलेल्या पंढरीनाथ आंबेरकर याच्या विरुध्द भादवी कलम 302 लावण्यात यावे अशी मागणी वाढत होती. त्यानंतर राजापूर पोलिसांनी आंबेरकर यांच्यावर भादवी कलम 302 ची नोंद केली. याबाबत जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.धनंजय कुलकर्णी यांनी सांगितले की, फिर्यादीच्या पुरवणी जबाबानुसार 302 कलम लावण्यात आले आहे. याबाबत अधिक तपास सुरू आहे. अधिक पुरावे जमा करण्यात येत आहेत. साक्षीदारांची माहिती घेतली जात आहे. तसेच सीसीटीव्ही फुटेजही तपासण्याचे काम सुरू आहे. बाकी तांत्रिक तपास सुरू असल्याची माहिती डॉ. कुलकर्णी यांनी यावेळी दिली.

अपघात की घातापात? पत्रकार शशिकांत वारिशे यांची राजापूर पेट्रोल पंपावर 'थार' गाडीने त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली होती. त्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी आता कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा अपघाती मृत्यू नसून घातपात आहे, असा आरोप पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या कुटुंबियांनी केला आहे. या प्रकरणातील आरोपी पंढरीनाथ आंबेरकर याच्याविरुद्ध भादंवि कलम ३०२ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राज्यातील पत्रकार संघटनांनी केली होती.

हेही वाचा -PM Narendra Modi in Rajya Sabha : कमळ उमलण्यात विरोधकांचेही योगदान - पंतप्रधान मोदी

ABOUT THE AUTHOR

...view details