महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोचिवली-डेहराडून रेल्वेतून दारू तस्करी; रत्नागिरी पोलिसांच्या कारवाईत 1 लाखाचा मुद्देमाल जप्त - रत्नागिरी रेल्वे पोलिस

या कारवाईत तब्बल 556 बॉटल्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. पोलीस निरीक्षक अजित मधाळे यांच्या नेतृत्वाखालील शनिवारी ही कारवाई करण्यात आली. दारू घेऊन येणारा व्यक्ती रेल्वेतून पळून गेल्याने तो पोलिसांच्या हाती लागला नाही.

कोचिवली-डेहराडून रेल्वेतून 1 लाखाची दारू जप्त

By

Published : Aug 17, 2019, 11:20 PM IST

Updated : Aug 17, 2019, 11:48 PM IST

रत्नागिरी - कोकण रेल्वेतून गोवा बनावटीची 1 लाख रुपये किमतीची दारू रत्नागिरी रेल्वे पोलिसांनी जप्त केली आहे. कोचिवली डेहराडून रेल्वेच्या जनरल बोगीतील स्वच्छतागृहाच्या बाजूच्या प्लायवूडमधून ही दारू जप्त करण्यात आली आहे. या कारवाईत तब्बल 556 बॉटल्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. पोलीस निरीक्षक अजित मधाळे यांच्या नेतृत्वाखालील शनिवारी ही कारवाई करण्यात आली. दारू घेऊन येणारा व्यक्ती रेल्वेतून पळून गेल्याने तो पोलिसांच्या हाती लागला नाही.

कोचिवली-डेहराडून रेल्वेतून 1 लाखाची दारू जप्त

सहा महिन्यापूर्वी अशाच प्रकारची कारवाई करून पोलिसांनी लाख रुपये किमतीची गोवा बनावटीची दारू जप्त केली होती. त्यानंतर पुन्हा अशी धडक कारवाई करण्यात आली आहे. मुंबईच्या दिशेने जाणारी कोचीवली डेहराडून या रेल्वेगाडीच्या अखेरच्या जनरल डब्यातील स्वच्छतागृहात एक व्यक्ती संशयास्पद असल्याची गोपनीय माहिती मधाळे यांना मिळाली होती. सकाळी दहा वाजता गाडी रत्नागिरी रेल्वे स्थानकात दाखल होणार होती. या कालावधीत पोलिसांनी सापळा रचला. गाडी रेल्वे स्थानकात येताच, सशस्त्र पोलिसांनी रेल्वेच्या डब्याला घेराव घातला आणि ही कारवाई केली.

पोलीस निरीक्षक अजित मधाळे यांच्या नेतृत्वाखाली अप्पाराव ठकनवार, जिजाब उबरहडे, गजानन बोडके राकेश कुमार, रवी कुमार, शंकर मधाळ, रोहिदास भालेराव, विजय सुरडकर विठ्ठल खंडागळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Last Updated : Aug 17, 2019, 11:48 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details