महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

संचारबंदीतही लग्नसोहळा गुहागरमध्ये भटजीसह चौघांवर गुन्हा दाखल - Ratnagiri police register FIR against wedding function during curfew

संचारबंदीचा भंग करत गुहागरमध्ये एका विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं होतं. या प्रकरणी दोन्ही यजमानांसह चौघांविरोधात गुहागर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

wedding-function-during-curfew
संचारबंदीतही लग्नसोहळा

By

Published : Apr 4, 2020, 5:02 PM IST

रत्नागिरी - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभर संचारबंदी आहे. एका ठिकाणी पाच पेक्षा अधिक लोकं जमण्यास सक्त मनाई करण्यात आलेली आहे. मात्र असं असतानाही या संचारबंदीचा भंग करत गुहागरमध्ये एका विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं होतं. या प्रकरणी दोन्ही यजमानांसह चौघांविरोधात गुहागर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

संचारबंदीतही लग्नसोहळा

गुहागर तालुक्यातील भातगाव कोसबीवाडी येथे शुक्रवारी हा विवाह सोहळा पार पाडला. या सोहळ्याला १०० ते १५० लोक हजर होते. गुहागर पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार , उपनिरीक्षक किरणकुमार कदम सहकाऱ्यांसह विवाहस्थळी दाखल झाले. संचारबंदी व जमावबंदी लागू असतानाही त्याचा भंग केल्याने काजुर्ती येथील भटजी संजय जोशी, वधू पिता प्रकाश धोंडू हारेकर, भातगावचे पोलीस पाटील सिद्धोधन गणपत मोहिते, वराचे पिता अनंत पांडुरंग वेले यांच्यावर भा . दं . वि . सं . कलम १८८ , २६९ , २७० , महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ ( १ ) ( ३ ) / १३५ , साथ रोग अधिनियम १८९७ चे कलम ३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details