रत्नागिरी -भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार प्रसाद लाड यांनी नारायण राणे आणि त्यांचे कुटुंबीय भाजपमध्ये आल्यास त्यांचे स्वागतच आहे. मात्र युती न झाल्यास आपण स्वतः रत्नागिरीतून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचा खुलासा केला आहे.
नारायण राणे भाजपात आल्यास त्यांचे स्वागतच - प्रसाद लाड जामखेडमध्ये भरणार यात्रांची जत्रा; भाजप-राष्ट्रवादीचे नेते आमनेसामने
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोकणात राजकीय घडामोडींना वेग आलेला पाहायला मिळत आहे. खासदार नारायण राणे भाजपमध्ये जाणार की नाही, याबद्दल तर्कवितर्क लावले जात आहेत. यातच भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. नारायण राणे आणि त्यांचे कुटुंबीय भाजपमध्ये आल्यास त्यांचे स्वागतच असेल, असे आमदार प्रसाद लाड यांनी म्हटले आहे. दरम्यान राणे यांच्या संदर्भातील निर्णय मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री अमित शाह घेतील, असे लाड म्हणाले. राणे भाजपत आल्यास कोकणातील भाजप कार्यकत्यांना देखील आनंदच होईल, अशी भूमिकाही लाड यांनी सष्ट केली आहे. दरम्यान विधानसभेसाठी सेना-भाजप युती अभेद्यच राहिल, असेही लाड यांनी स्पष्ट केले आहे. मात्र युती झाली नाही तर आपण स्वतः रत्नागिरी विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे प्रसाद लाड यांनी सष्ट केले आहे.
रत्नागिरी विधानसभेचे राजकिय चित्र..
विधानसभा निवडणूकीच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांनी सावध पावले टाकायला सुरुवात केली आहे. त्यातच कोण कुठून निवडणूक लढणार याचीही चाचपणी सध्या सुरू आहे. भाजप आणि शिवसेनेत सध्या इतर पक्षातील आमदारांचे इन्कमिंग जोरात सुरू आहे पण युती भक्कम असल्याचेही म्हटले जात आहे. दरम्यान कोकणातही राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काही मतदारसंघांबाबत निवडणूकीच्या चर्चाही सुरू झाल्या आहेत. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ हा नेहमीच चर्चेत असणारा मतदारसंघ.. युती असताना हा मतदार संघ नेहमी भाजपच्या वाट्याला असायचा.. मात्र गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप वेगवेगळे लढले होते. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत दाखल झालेल्या उदय सामंत यांनी या मतदारसंघातून दणदणीत विजय मिळवला होता. अलीकडे पक्षाने त्यांच्यावर शिवसेना उपनेते आणि म्हाडा अध्यक्षपदाची जबाबदारी दिलेली आहे.. दरम्यान विधानसभा निवडणुकीत युती झाली नाही तर आपणही पक्षाने जबाबदारी दिल्यास या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे भाजप प्रदेश उपाध्यक्ष आणि आमदार प्रसाद लाड यांनी म्हटले आहे. एकीकडे युती भक्कम असल्याचे म्हटले जाते आणि अशाच वेळी भाजप प्रदेश उपाध्यक्ष आमदार प्रसाद लाड यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे मात्र युतीबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.. त्यामुळे एकूणच भाजपही स्वबळावर लढण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे..
हेही वाचा...
रत्नागिरीत नारळ लागवडीमधून रोजगार निर्मिती करणार - जिल्हाधिकारी सुनील चव्हाण