महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गुहागरमधून भास्कर जाधवांना उमेदवारी निश्चित? जन आशीर्वाद यात्रेत आदित्य ठाकरेंनी दिले संकेत - गुहागर मतदारसंघ

भास्कर जाधव यांच्या प्रचाराला आणि विजयी मेळाव्याला पुन्हा येणारच आहे, असे सांगत गुहागर मतदारसंघातून जाधव यांची उमेदवारी जवळपास निश्चित असल्याचे संकेत जन आशीर्वाद यात्रे दरम्यान आदित्य ठाकरे यांनी दिले आहेत.

आदित्य ठाकरेंची जन आशीर्वाद यात्रा गुहागरमध्ये दाखल

By

Published : Sep 15, 2019, 5:04 PM IST

रत्नागिरी - आदित्य ठाकरेंची जन आशीर्वाद यात्रा रविवारी गुहागरमध्ये दाखल झाली. यानंतर येथे झालेल्या सभेत ठाकरे यांनी भास्कर जाधवांच्या प्रचाराला आणि विजयी मेळाव्याला पुन्हा येणारच आहे, असे सांगितले. यामुळे गुहागरमधून आता जाधव यांची उमेदवारी जवळपास निश्चित असल्याचे संकेत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिले आहेत.

आदित्य ठाकरे यांनी दिले भास्कर जाधवांच्या उमेदवारीचे संकेत

आदित्य ठाकरे यांच्यासोबत यावेळी खासदार विनायक राऊत, पर्यावरण मंत्री रामदास कदम, जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र वाईकर, शिवसेना उपनेते आणि म्हाडा अध्यक्ष उदय सामंत आदी यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा... ज्यांच्या गाडीवर कायम लाल दिवा राहिला ते स्वार्थासाठी दुसऱ्या पक्षात, जयंत पाटलांचा नाईकांना टोला

भास्कर जाधव शिवसेनेत आल्यामुळे गुहागरमध्ये शिवसेनेची ताकद वाढली आहे. दरम्यान पायावरील शस्त्रक्रियेनिमित्त रुग्णालयात असल्याने जाधव रविवारी जन आशीर्वाद यात्रे दरम्यान झालेल्या सभेला उपस्थित राहू शकले नव्हते., मात्र त्यांचे चिरंजीव व जि.प. सदस्य असलेले विक्रांत जाधव तसेच मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

हेही वाचा... विदर्भातील शिवसैनिक स्वबळावर लढण्यास तयार; इच्छुकांनी दिल्या मुलाखती

राष्ट्रवादी काँग्रेस सोडून पुन्हा शिवसेनेत दाखल झालेल्या भास्कर जाधव यांचा गुहागर मतदारसंघ हा तसा युतीत भाजपचा पारंपरिक मतदारसंघ आहे. या जागेवर आपलाच दावा असल्याचे भाजपकडून सांगण्यात येत आहेत. भास्कर जाधव यांनी मात्र या मतदारसंघात शिवसेनेकडून निवडणूक लढायला आवडेल, असे म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी आपल्या भाषणात भास्कर जाधव यांची उमेदवारी पक्की असल्याचे संकेत दिले.

हेही वाचा... राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात आज मुख्यमंत्र्यांचा जनादेश, उदयनराजे राहणार उपस्थित

गुहागरमध्ये भास्कर जाधव यांच्या प्रचाराला मी येणारच आहे आणि विजयी मेळाव्याला सुद्धा येणार असल्याचे, आदित्य ठाकरे यांनी सांगितले. पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनीही आपल्या भाषणात गुहागरमध्ये भास्कर जाधव यांच्या प्रचाराला येणार असल्याचे सांगत एकप्रकारे जाधव यांची गुहागर मतदारसंघातील उमेदवारी पक्की असल्याचे संकेत दिले.

हेही वाचा... रत्नागिरीतील गुहागर जागेवर भाजपचा दावा; प्रसाद लाड यांची मागणी

खरा देव हा जनता जनार्दन, मी त्याचे आशीर्वाद घ्यायला आलोय - ठाकरे

जन आशीर्वाद यात्रेत लोकांना संबोधित करताना, आदित्य ठाकरे म्हणाले, की लोकांची गर्दी हाच जन आशीर्वाद असून मी आता काही मते मागायला आलेलो नाही. लोकसभा निवडणुकीत तुम्ही जी साथ दिलीत त्याबद्दल जनतेचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे. देवांचे आशीर्वाद गरजेचे आहेत, पण खरा देव हा जनता जनार्दन आहे आणि त्याचे आशीर्वाद मी घ्यायला आलो असल्याचे आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details