रत्नागिरी - कोरोना विरोधातील लढाईसाठी अनेकजण मदतीचा हात पुढे करत आहेत. नाणीजच्या नरेंद्राचार्य महाराज संस्थान मदतीसाठी सरसावले आहे. आपली सामाजिक बांधिलकी जपत संस्थानने ५२ लाख रुपयांची मदत पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी दिली आहे. या संदर्भातील धनादेश रत्नागिरी जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आला आहे.
नाणीजच्या नरेंद्राचार्य महाराज संस्थानकडून पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी 52 लाख
कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत जात आहे. त्यामुळे सरकारच्या मदतीसाठी अनेक हात पुढे येत आहेत. अनेक दानशूर व्यक्ती, संस्था यांनी सढळ हस्ते सरकारला मदत केली आहे.
कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत जात आहे. त्यामुळे सरकारच्या मदतीसाठी अनेक हात पुढे येत आहेत. अनेक दानशूर व्यक्ती, संस्था यांनी सढळ हस्ते सरकारला मदत केली आहे. दरम्यान, रत्नागिरीतील नाणीज येथील नरेंद्रचार्य महाराज संस्थानने याच महिन्याच्या सुरुवातील मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ५० लाख रुपये जमा केले होते. संस्थानच्या या निर्णयाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः स्वागत केले होते. यानंतर आताही नरेंद्रचार्य महाराज संस्थानने पंतप्रधान सहाय्यता निधीत ५२ लाखांच्या मदतीचा हात दिला आहे. संस्थेच्या अधिकाऱ्यांनी आज हा धनादेश जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द केला.