महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रत्नागिरी नगर परिषद नगराध्यक्ष निवडणुकीसाठी अंतिम मतदार यांदी प्रसिद्ध, स्त्री मतदारांची संख्या अधिक - Ratnagiri city president Election News

रत्नागिरी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. रत्नागिरी शहरात सर्वात जास्त स्त्री मतदार आहेत.

ratnagiri-municipal-council-releases-final-voter-list-for-mayor-elections
रत्नागिरी नगर परिषद नगराध्यक्ष निवडणुकीसाठी अंतिम मतदार यांदी प्रसिद्ध

By

Published : Nov 28, 2019, 5:01 PM IST

रत्नागिरी - नगर परिषदेच्या नगराध्यक्ष निवडणुकीसाठी मतदार यादी अंतिम करण्यात आली आहे. रत्नागिरी शहरात एकूण ५८ हजार ७७० मतदार असल्याची नोंद आहे. मतदारांमध्ये स्त्री मतदारांची संख्या अधिक आहे. शहरात ३० हजार २३ स्त्री मतदार तर २८ हजार ७४६ पुरुष मतदार आहेत. मतदानासाठी शहरात ४९ मतदान केंद्र उभारण्यात येणार आहेत.

रत्नागिरी नगर परिषद नगराध्यक्ष निवडणुकीसाठी अंतिम मतदार यांदी प्रसिद्ध

रत्नागिरी नगर परिषदेच्या थेट नगराध्यक्ष निवडणुकीत सेनेच्या राहूल पंडीत यांनी बाजी मारली होती. मात्र, त्यावेळी त्यांच्यासह इच्छुक असलेले प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांना अडीच वर्षानंतर संधी देण्याचा शब्द देण्यात आला होता. दोन वर्षांनी राहूल पंडीत यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली. मात्र, लोकसभेच्या तोंडावर सेनेने राहूल पंडीत यांना रजेवर पाठवण्याचा निर्णय घेतला. लोकसभा निवडणुकीनंतर अडीच वर्षांनी राहुल पंडीत यांनी पदाचा राजीनामा जिल्हाधिकाऱ्यांकडे दिला.

राहूल पंडीत यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या नगराध्यक्ष निवडणुकीसाठी निवडणुक विभागाने हालचाली सुरू केल्या आहेत. विधानसभा निकालानंतर कोणत्याही क्षणी नगराध्यक्ष निवडणुकीसाठी आचारंसहिता घोषित होईल अशी अपेक्षा होती. निवडणुकीसाठी मतदार यादी अंतिम करण्यात आली आहे. शहरात ५८ हजार ७७० मतदार आहेत. यापैकी २८ हजार ७४६ पुरूष तर ३० हजार २३ स्त्री मतदार आहेत. इतर मतदार एक आहे. अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली असून कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागु होऊन नगराध्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊ शकतो.

ABOUT THE AUTHOR

...view details