रत्नागिरी- मालमत्ता कर थकविणाऱ्यांना पालिकेने कारवाईचा दणका दिला आहे. मालमत्ता कर थकविणाऱ्या शहरातील ४० जणांची मालमत्ता पालिकेने जप्त केली आहे. तर आतापर्यंत ७२ टक्के कर वसुली पूर्ण झाली आहे.
कर थकविणाऱ्या ४० जणांची मालमत्ता रत्नागिरी पालिकेने केली जप्त - मालमत्ता कर थकविणाऱ्यांवर रत्नागिरी पालिकेची कारवाई
मालमत्ता कर थकविणाऱ्या शहरातील ४० जणांची मालमत्ता पालिकेने जप्त केली आहे. तर आतापर्यंत ७२ टक्के कर वसुली पूर्ण झाली आहे. यावर्षी पालिकेने वसुलीची धडक मोहीम सुरू केली आहे.

सन २०२०-२१ या आर्थिक वर्षाच्या कर वसुलीची मोहीम पालिकेने सुरू केली आहे. शहरातील विविध मालमत्तांचा कर पालिकेमार्फत वसूल केला जातो. गतवर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने टाळेबंदी करण्यात आली होती. त्यामुळे मार्च अखेर वसुलीचे उद्दीष्ट पूर्ण करणे पालिकेला शक्य झाले नव्हते. यावर्षी पालिकेने वसुलीची धडक मोहीम सुरू केली आहे. कर थकविणाऱ्या करदात्यांवर जप्तीची कारवाई सुरू करण्यात आली असून ४० मालमत्ता टाळे लावून ताब्यात घेण्यात आल्या आहेत.
एकूण उद्दीष्टापैकी ७२ टक्के वसुली पूर्ण
एकूण उद्दीष्टापैकी ७२ टक्के वसुली पूर्ण झाली आहे. आज आर्थिक वर्षाचा अखेरचा दिवस असल्याने पालिकेचे कर वसुलीचे उद्दीष्ट शंभर टक्के पूर्ण होण्याची शक्यता संपली आहे. तरीहि अखेरच्या दिवशी जास्तीत जास्त करदात्यांनी कर जमा करण्यासाठी पालिका अधिकारी, कर्मचारी प्रयत्न करत आहेत. कर थकीत ठेवणाऱ्या करदात्यांना पालिकेने नोटीस बजावली आहे. कोरोनाचा प्रदुर्भाव पुन्हा वाढू लागल्याने त्याचा अडथळा कर वसुलीत झाला आहे. मार्च अखेरपर्यंत कर न भरणाऱ्या करदात्यांची मालमत्ता सील करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. यामुुळे करदात्यांचे धाबे दणाणले आहेत.