रत्नागिरी -कोरोना संकटाच्या काळात एमपीएससी परीक्षा वारंवार पुढे गेल्याने एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना रत्नागिरी जिल्ह्यात घडली. लांजा तालुक्यातील कोर्ले गावात हा प्रकार झाला. महेश झोरे (वय २६) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
गावाकडच्या घरी आत्महत्या -
महेश झोरेचे आई, वडील आणि दोन भाऊ कामानिमित्त मुंबईला रहातात. अभ्यास करण्यासाठी महेश कोर्ले येथील गावाकडच्या घरी आला होता. महेश याला स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी बनायचे होते. त्यासाठी तो आपल्या गावाकडच्या घरी अभ्यास करत होता. एकट्या राहणाऱ्या महेशला भेटण्यासाठी त्याचे आजोबा कोर्ले येथील घरी जात असत. गुरूवारी महेशचे आजोबा घरी आले. त्यावेळी महेशने गळफास लावल्याचे त्यांना आढळले.