रत्नागिरी - स्मशानभूमीत जाऊन वंशाचा दिवा मुलगा हवा म्हणाऱ्यांच्या डोळ्यात एक अंजन घालणारी बातमी आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील देवळे गावात आईच्या निधनानंतर मुलीनेच स्मशानभूमीत जाऊन अत्यसंस्कार केले.
रत्नागिरीतील देवळेत आईच्या चितेला मुलीने दिला मुखाग्नी - ratnagiri funeral news
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील देवळे गावात आईच्या निधनानंतर मुलीनेच स्मशानभूमीत जाऊन अत्यसंस्कार केले.
आईवर मुलीने केले अंत्यसंस्कार
स्नेहलता माने यांचे वयाच्या 80व्या वर्षी 3 फेबुवारीला निधन झााले. पण स्नेहलता यांना मुलगा नाही, तर चारही मुली. स्नेहलता यांचा पतीचे यापूर्वीच निधन झाले आहे. त्यानंतर पदरातील चार मुलींना स्नेहलता यांनी आधार देत लहानाचे मोठे केले. दरम्यान, 3 फेबुवारीला स्नेहलता यांचे निधन झाले. मुलगा नसल्याने या मातेला अग्नी देणार कोण, असा प्रश्न उपस्थित झाला. पण न डगमगता स्नेहलता यांची तीन नंबरची मुलगी सविता लाखाटे यांनी आपल्या आईला अग्नी देऊन मुलगीसुद्धा वंशाचा दिवा आहे, हे दाखवून दिले. थेट स्मशानभूमीत जावून या मुलीने आईच्या अंत्यविधीचे सर्व कार्य पूर्ण केले आणि आईच्या चितेला मुखाग्नी दिला. त्यामुळे या मुलीने वंशाला मुलगा हवा म्हणणाऱ्यांच्या डोळ्यात एकप्रकारे अंजन घातले आहे.